logo

*इंडियन मेडिकल असोसिएशन & NIMA शहादा तर्फे कलकत्ता येथे झालेल्या महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ तहसीलदार यांना शहादा येथील विविध डॉक्टर्स असोसिएशन कडून निवेदन*


कलकत्ता येथे नुकताच झालेला आपल्या डॉक्टर भगिनी वरील अमानुष अत्याचार आणि खून हा अत्यंत घृणास्पद असा प्रकार असून निषेधार्थ आहे.

डॉक्टरांवरील वाढते अत्याचार आणि मारहाणीच्या घटना या आता मर्यादेच्या पलीकडे जात असून आपल्या डॉक्टर कम्युनिटीवर होणारे हे अत्याचार हे कायदे करूनही वाढत आहेत त्यामुळे आपल्या संरक्षणाची जबाबदारी घेतली गेली पाहिजे आणि त्यासाठी शासनाकडून योग्य ती पावलं उचलली गेली पाहिजे यासाठी शहादा येथील विविध डॉक्टर्स संघटनांनी आज प्रशासनाला निवेदन दिले व कलकत्ता येथे झालेल्या घटनेचा निषेध नोंदवला.
जी घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्य आहे या घटनेचा इंडियन मेडिकल असोसिएशन IMA & NIMA , Homeopathic Association शहादा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.

आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यासह तहसीलदार शहादा यांना आज इंडियन मेडिकल असोसिएशन शहादा तर्फे निवेदन देण्यात आले व निषेध नोंदवण्यात आला.

तसेच यात,
इंडियन मेडिकल असोसिएशन,
नीमा, आणि होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशन शहादा या असोसिएशन च्या सदस्यांनी सहभाग घेतला.

डॉ प्रशांत पाटील ,
AMA Reporter

9
2317 views