logo

महाराष्ट्र ग्राम रोजगार सेवक संघटना

संपूर्ण महाराष्ट्रातील ग्राम रोजगार सेवक बंधू आणि भगिनींना सादर नमस्कार आपल्या ग्राम रोजगार सेवकांच्या जीवनात सोन्याचा दिवस उगवलेला आहे .आपल्या उज्वल भविष्याकरिता ज्या अथक परिश्रमातून आपण आपल्या न्याय व हक्काच्या मागण्या शासनापर्यंत मांडल्या आणि आपल्याला गेल्या 17 वर्षापासून उपेक्षित वंचित ठेवलेलं होतं तो कलंक कायमचा मिटलेला आहे . माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी कॅबिनेट बैठकीमध्ये आपल्या संदर्भात फार महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहे . युवकांचे हृदय स्थान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे माननीय नवीन जी गवळी साहेब व माननीय संदीप जी माने साहेब यांच्या अथक प्रयत्नातून आशीर्वादानेआपल्याला आकृतीबंध समायोजन करून ग्राम रोजगार सहायक म्हणून पदनाम देण्यात आले.आपले मानधान आपल्या खात्यामध्ये डायरेक्ट पडणार .आपल्याला 50 लाख रुपये विमा संरक्षण लागू करण्यात येणार .TADA व नेट पॅक करिता 1800 रुपये दर महा मिळणार. महाराष्ट्रामध्ये असा ऐतिहासिक निर्णय ग्राम रोजगार सेवकांसाठी प्रथमताच घेण्यात आलेला आहे या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी महामंडळाची तारीख मिळताच प्रत्येक रोजगार सेवकाला रेस कोर्स मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहून GR ची कॉपी प्रत्यक्ष आपल्या हातात मिळणार आहे याकरिता आपल्या तालुक्याचे पूर्ण तालुका न्याय नियोजन करून प्रत्येक ग्रामरोजगार सहाय्यकाने महामेळाव्याला सह पत्नी उपस्थित रहावे तसेच न भूतो न भविष्यती आपल्या न्याय हक्काच्या मागण्या आपल्या पदरात पडलेले आहेत करिता महामेळायला फार मोठ्या संख्येने उपस्थित आहेत निश्चित झाल्याबरोबर आपण सर्वांना कळविण्यात येईल त्या सर्वांचे नियोजन करण्यासाठी मुंबईमध्येच आहे आणि ती तारीख नक्कीच लवकरच कळविण्यात येणार तत्पूर्वी आपण आपल्या तालुक्याचे संपूर्ण नियोजन करावे जिल्ह्याचे संपूर्ण नियोजन करावे ,
ही विनंती.
आपला
राजेंद्र जिचकार
महासचिव
ग्राम रोजगार सहायक संघटना महाराष्ट्र राज्य.

456
4756 views