logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

स्वातंत्र्य दिनी समाजसेवक भूषण पवार यांचा विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचा संदेश

स्वातंत्र्य दिनी समाजसेवक भूषण पवार यांचा विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचा संदेश

मुकेश श्रीकृष्ण धावडे
मुंबई प्रतिनिधी, ता.15
उद्याचा भारत घडवणाऱ्या तरुण पिढीमध्ये दिवसेंदिवस व्यसनाचे प्रमाण वाढत चालले आहे. यावर वेळेत नियंत्रण मिळवण्याची गरज आहे. त्यासाठी जनजागृती करण्याचे कार्य 'भूषण प्रतिष्ठान'ने हाती घेतले आहे. मात्र हे कार्य लहान नाही त्यामुळे प्रत्येकाचा यात सहभाग हवा. विद्यार्थ्यांना भविष्यात प्रगती करायची असेल तर त्यांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नये. आणि आपल्या मित्र, मैत्रिणी तसेच आपल्या आस -पास च्या लोकांना व्यसन करण्यापासून रोखले पाहिजे. असा महत्त्वपूर्ण संदेश 'भूषण प्रतिष्ठान'चे संस्थापक अध्यक्ष, समाजसेवक भूषण पवार यांनी पवई येथील महात्मा एज्युकेशन सोसायटी च्या पवई मराठी माध्यमिक शाळेत गुरुवार, (ता.15) ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दिला. तसेच दैनिक सकाळ वृत्तपत्राच्या माध्यमातून आपली वाचन संस्कृती टिकवण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना देऊन स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. दरम्यान भूषण पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असून विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षक आणि प्रध्यापक यांना भेट वस्तू देण्यात आल्या. तसेच खाऊ वाटप देखील करण्यात आला. यावेळी पवई मराठी माध्यमिक शाळा विश्वस्त प्रभावती पिल्लई, मुख्याध्यापिका शिवानी कर्पे, सहायक शिक्षक चंद्रकांत भावसार, शिक्षक भोजराज नारखेडे, शिक्षक मंगेश धनावडे, लिपिक प्रमोद सुरवाडे, शिपाई विलास कुरणे, शिपाई रमादेवी अम्मा एस.,भूषण प्रतिष्ठानचे विश्वस्त शिवप्रसाद मागाडे उपस्थित होते.

181
6805 views

Comment