पोलिसांसमोर पर्यटकांची खुलेआम लुट, जुगार किंग जोमात भंडारदरा पर्यटन ठरतोय जुगारीचे केंद्र बिंदू
अहमदनगर/भंडारदरा :- भंडारदरा धरणावर खुलेआम पोलिसांसमोर पर्यटकांची लुट सुरू असुन पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आज पहावयास मिळाले. याबाबत सविस्तर माहिती अशी की पर्यटकांची पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या भंडारदरा येथे 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनानिमित्त पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती मात्र याठिकाणी एका पत्र्याच्या शेडमध्ये काळा पिवळा हा जुगारी चा खेळ मोठ्या जोमात सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले अनेक पर्यटक आपले पैसे त्यात हारून निराक्ष झालेले दिसले. याबाबत स्थानिक व्यावसायिकांना विचारले आसता हा खेळ अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे सांगण्यात आले आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त असताना देखील पोलिसांसमोर खुलेआम हा जुगारीचा खेळ चालू होता तर पोलिस मात्र बघ्येच्या भुमिकेत दिसुन आले याबाबत भंडारदरा ग्रामपंचायतचे माजी सरपंच पांडुरंग खाडे, उपसरपंच गंगाराम ईदे , सदस्य दिपक खाडे, पोपट खाडे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी हे या ठिकाण आल्यानंतर राजुर पोलिस ठाण्याचे पि.आय दिपक सरोदो व त्यांच्या कर्मचारी यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी याबाबत कोणतीही कारवाई न करता त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला मात्र या खुलेआम सुरू असलेल्या जुगार व तक्रार करूनही पोलिस योग्य ती कारवाई करत नसल्याने आम्ही याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा अधिकारी, पालक मंत्री तथा महसुल मंत्री, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच आजी व माजी आमदार यांना लेखी तक्रार देणार असल्याचे महाराष्ट्र राज्य पेसा सरपंच परिषदेचे सचिव तथा मा. सरपंच पांडुरंग खाडे व उपसरपंच गंगाराम ईदे यांनी सांगितले व पुढे बोलताना मा. सरपंच पांडुरंग खाडे म्हणाले की या जुगारीला पाठबळ देणाऱ्यांवर योग्य ती कारवाई न झाल्यास व त्यामुळे ग्रामस्थांचा उद्रेक होऊन कायदा व सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्व जबाबदारी हि स्थानिक पोलीस व प्रशासनाची आ