logo

शिवछत्रपती महाविद्यालयाने केले तिरंगा झेंड्याचे वाटप.

पाचोड प्रतिनिधी
तोहित पटेल
स्वतंत्र्याचा महोत्सव देशभर सुरू असून भारत सरकार महाराष्ट्र शासन यांच्या आदेशान्वये आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या परिपत्राचा नुसार पाचोड येथील शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हर घर तिरंगा- घरोघरी तिरंगा ध्वज उभारण्यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने चौदा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता पुढाकार घेऊन मुख्य बाजारपेठेमध्ये नागरिकांना व विविध प्रकारच्या दुकानदारांना तिरंगा झेंड्याचे वाटप करून झेंड्याचे महत्त्व त्यांचा सन्मान राष्ट्रगीत सेल्फी फोटो याविषयी संबंधितांना माहिती दिली. जवळपास 100 झेंड्याचे वाटप करण्यात आले याबद्दल परिसरातील नागरिकांनी सुद्धा समाधान व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांनी महाविद्यालयातील ध्वजारोहणानंतर या तिरंगा झेंड्याच्या रॅलीला हिरवी झेंडी दाखवून कार्यक्रमाची सुरुवात केली. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. हरिप्रसाद बिडवे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ . सुरेश नलावडे उपप्राचार्य डॉ. शिवाजी यादव यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

5
1976 views