उध्दवजींनी केला महिलांचा खरा सन्मान ! : वैशालीताई सुर्यवंशी
लासगाव येथील शेकडो महिलांचा पक्षात प्रवेश...
उध्दवजींनी केला महिलांचा खरा सन्मान ! : वैशालीताई सुर्यवंशी
लासगाव येथील शेकडो महिलांचा पक्षात प्रवेश केला.
पाचोरा,जिल्हाध्यक्ष (प्रतिनिधी Aima Media ) : ''मला विधानसभेला उमेदवारी जाहीर करून उध्दव ठाकरे साहेबांनी महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान केला आहे. याचमुळे मतदारसंघातील महिला एकजुटीने आमच्या पाठीशी उभे राहत असल्याचे चित्र असून याचमुळे मतदारसंघात परिवर्तन होणारच !'' असे प्रतिपादन वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी केले. त्या लासगाव येथील प्रवेश सोहळ्यात बोलत होत्या.
पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. यात आज लासगाव येथील शेकडो महिलांनी देखील पक्षात प्रवेश घेतला. या सर्वांचे स्वागत करून मनोगत व्यक्त करतांना वैशालीताई यांनी नारी शक्ती आमच्या पाठीशी येत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आणि मी आपल्या कामांसाठी कटीबध्द असल्याचे नमूद करत, आगामी निवडणुकीत भुलथापांना बळी न पडता मशाल या चिन्हावरच मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी यांनी पक्षात प्रवेश घेतलेल्या भगिनींचे स्वागत केले.
या प्रवेश सोहळ्याला त्यांच्यासह उध्दव मराठे, विनोद बाविस्कर, मिथुन वाघ, धर्मसिंग पाटील, सचिन पाटील, दीपक पाटील, प्रवीण पाटील, महेंद्र पाटील, दीपक दलवे, युग लखन दुसाने, पिंटूभाऊ, राजू शेख, हरून शेख, रवी पाटील, समीर देशमुख, परमेश्वर राठोड, नाना पाटील, कृष्णा बडगुजर, अमीन शेख, बापू भगवान पाटील, चेतन महाजन, राहूल पाटील, चंदू पाटील, सचिन राजपूत, दीपक दलवे, रवींद्र पाटील, कपिल करणसिंग, लताबाई प्रताप पाटील, विमलबाई रूपसिंग पाटील, प्रतिभा नारायण पाटील, आशाबाई भगवान पाटील, अर्चनाबाई हरी पाटील, शेहनाजबी शेख हसन व बेबाबाई अकबर शेख यांच्यासह शिवसेना-उबाठा पक्षाचे पदाधिकारी, युवासेना तसेच विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.