तारखेडा विकासोच्या नवनिर्वाचीत चेअरमन यांचा सत्कार....!
तारखेडा विकासोच्या नवनिर्वाचीत चेअरमन यांचा वैशाली ताई सुर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पाचोरा, जिल्हाध्यक्ष(प्रतिनिधी Aima News ) :
तालुक्यातील तारखेडा येथील विविध कार्यकारी सहकारी
सोसायटीच्या चेअरमनपदी दिलीप भाऊसाहेब पाटील (छोटूभाऊ ) यांची नियुक्ती
झाल्याबद्दल आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात वैशालीताई सुर्यवंशी यांनी दिलीप पाटील यांचा सत्कार करून त्यांना पुढील
वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला माजी सरपंच अरूण बाबूलाल पाटील, माजी
चेअरमन अर्जुन आनंदा पाटील, माजी सदस्य अभिमन बळीराम पाटील, माजी ढुध डेअरी
चेअरमन नाना विठ्ठल पाटील, पोलीस पाटील रवींद्र चव्हाण, अमोल गोविंदा पाटील, वाल्मीक
शेनफठू बागूल, सामाजिक कार्यकर्ते गंभीर भाऊसाहेब पाटील, ढत्तू किसन जाधव, बापू दत्तू
पाटील, डेअरी सदस्य शांताराम तुकाराम पाटील, माजी तंटामुक्ती अध्यक्ष देविदास रामदास
पाटील, विजय दत्तू पाटील, रवींद्र भीमराव पाटील, भाऊसाहेब बापू पाटील, संतोष पाटील व
निखील भुसारे यांची उपस्थिती होती.