logo

नागपुर जिल्हा पारशिवनी तालुक्यातील करंभाड येथे जागतीक मूलनिवासी(आदिवासी) दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी -
अखिल गोंडवाना कोयापुनेम भूमका सेवा संस्थाचा वतिने करंभाड येथे जागतिक मूलनिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक तिरुमाल धनराजजी मडावी सर यानी समाजबांधवाना आपली एकता आणि एकात्मता कशाप्रकारे टिकुन राहिल याबाबाद मार्गदर्शन केले.
यानांतर बैंडबाजासह संपूर्ण ग्रामप्रभात फेरी करंभाड येथिल मुख्य मार्गदर्शक सौ. लक्ष्मीताई नंदलालजी पंधरे यांच्या निवास स्नाथानावरुन नगरितील मुख्य
मार्गाने मार्गक्रमणकरत भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतल्याला माल्यार्पण केले .या नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतल्याला माल्यार्पण केले .या नंतर जागतिक मूलनिवासी दिवसा निमित्त मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सत्यफुलाताई मडावी (माजी पं. स .सदस्य), संदिपजी भलावी (पंचायत समिती सदस्य ) सुरेशजी भलावी सर ,स्वेता ढेकले (सामाजिक कार्यकर्ता पारशिवनी) तसेच कोयापुनेम संघटना करंभाड,वीरांगना रानीदुर्गावती महिलामंडल करंभाड सह संपूर्ण ग्रामवासी उपस्थित होते.
यानांतर हि रैली पारशिवनी समोर पेंच, खैरी, चारगाव, धवलापुर, नरहर येथे कार्यक्रम समाप्त झाला.
प्रतिनिधी: अक्षय गजभिये
सौजन्य:सम्राट अशोका प्रिंटर्स

62
2081 views