logo

लातुर तालुक्यातील दगडवाडी गावात किशोरवयीन व महिला भगिनींसाठी सॅनिटरी पॅड वेंडींग मशिन बसविण्याची मागणी ..

तालुक्यातील सलगरा बु.ग्रा.पं.अंतर्गत मौजे दगडवाडी येथे सार्वजनिक सॅनिटरी पॅड मशिन बसविण्यासाठी गावातील किशोरवयीन व महिला भगिनी आग्रही आहेत .तशी मागणी सरपंच सौ .शांताबाई गुलाब राव साळुंके यांना निवेदनाद्वारे मागणी केली जात आहे ..
सदर गावात आसपास महिला व भगिनी यांना त्यांच्या मासिक पाळी काळात सहजासहजी सॅनिटरी पॅड ऊपलब्ध होत नाहीत ,त्यामुळे त्या घरगुती उपाय करतात,पण त्या काळात आरोग्यासाठी ही पध्दत खुप धोकादायक आहे .त्यांना विविध संसर्ग रोग होण्याचा संभव अधिक असतो .
यासाठी गावातील महिलांनी पुढाकार घेऊन सदर मशिन गावातच ऊपलब्ध करुन द्यावी अशी मागणी महिला जोर धरत आहेत ..याबाबत सरपंच काय निर्णय घेतात हे औत्सुक्याचं ठरणार आहे ...

106
4351 views