नानासाहेब जावळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तुळजापुरात मराठा आरक्षण जागर सभा
धाराशिव : (प्रतिनिधी)
मराठा आरक्षण जागर सभा 9 ऑगस्ट क्रांती दिन अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर येथे मराठा आरक्षण जागर सभा होणार आहे. मराठा समाजाचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अखिल भारतीय छावा संघटना, महाराष्ट्र राज्य यांनी या सभेचे आयोजन केले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील सर्व जनतेला आव्हान आहे की या आई तुळजाभवानीच्या दारात मराठा, शेतकरी ,विद्यार्थी यांचे ज्वलंत प्रश्न घेऊन नानासाहेब जावळे पाटील या सभे संबोधित करतील तरी सर्वांनी आपण या जनतेने सहभागी व्हावे असे आव्हान अखिल भारतीय छावा संघटना धाराशिव करीत आहे . चलो तुळजापूर 9 ऑगस्ट 2024 वार शुक्रवार , ठिकाण -तुळजाभवानी मंदिर प्रवेशद्वारासमोर, वेळ- दुपारी 1 वाजता शेतकरी, मराठा समाज बांधव, विद्यार्थी इतर जनतेने या सभेस सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन
जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळुंके यांनी केले आहे.