पंचायत समिती सभापतीपदाचे रोस्टर मुहूर्त केव्हा ?
तुमसरः पंचायत समिती सभापतींचा कार्यकाळ हा अडीच वर्षांचा असतो. विद्यमान सभापतींचा कार्यकाळ संपायला केवळ चार महिने शिल्लक राहिले आहेत. नियमानुसार काही महिन्यांपूर्वी सभापतीच्या आरक्षणाच्या रोस्टर काढावा लागतोः परंतु तो अजूनपर्यंत रोस्टर काढण्यात आला नाही. प्रशासनाकडून रोस्टर काढण्याचा मुहुर्त केव्हा?, असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.
सभापती पदाचे रोस्टर किमान सहा महीन्यापुर्वी घोषीत करावे अस नियम आहे ? परंतु येथे चार महीने शिल्लक असुनही अदयापही रोस्टर काढण्या करीता कोणत्याही हालचाली प्रशासनाकडुन इ झालेल्या दिसत नाही. त्यामुळे येथे पुन्हा प्रतिक्षा करावी लागणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश प्राप्त होताच सभापती पदाचे आरक्षण एक-दोन आठवड्यात काढण्यात येईल. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
स्थानिक स्वराज्य संस्थेची पंचायत समिती ही तालुकास्तरावरील अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. पंचायत समिती सभापतीच्या कार्यकाळ हा अडीच वर्षांचा ठेवण्यात आला आहे. प्रत्येक सभापतींचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी किमान सहा महिन्यांपूर्वी किमाण सहा महिन्यांपूर्वी सभापतीपदाचे रोस्टर प्रशासनाकडून काढण्यात येते. सध्या त सभापतीचा कार्यकाळ केवळ चार महिने शिल्लक राहिला आहे; परंतु प्रशासनाकडून अजूनपर्यंत सभापतीपदाच्या रोस्टरची घोषणा अजूनपर्यंत केली नाही. येथे प्रशासनाला रोस्टर काढण्याचा विसर तर नाही पडला. ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. निवडणूक आयोग व प्रशासन निवडणुकीच्या कामात हयगय करीत नाही, तशा सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात येतात. तालुक्याचे प्रथम क्रमांकाचे पद हे सभापतींचे मानले जातेः परंतु त्यांच्या पदांचे रोस्टर पंचायत कार्यालय
लागत आहे असा प्रश्न पडला आहे. नियमानुसार काही महिन्यांपूर्वीच सभापतीपदाचे रोस्टर काढण्यात येते. सध्या केवळ चार महिने शिल्लक आहेत. तरी सुध्दा अजुन पर्यंत रोस्टर काढण्यात आले नाही. त्यामुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुढील महिन्यात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका घोषित होऊन आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर राज्यात नवीन सरकार स्थापन होण्याकरिता वेळ लागेल या सर्व प्रक्रियेत सभापतींचे रोस्टर पुन्हा रखडण्याची शक्यता नाकारता येत नाही.