
बुलढाण्यात अनोखे आंदोलन.. अधिकाऱ्यांचे कपडे काढन्याच्या इशा- याने प्रशासनात खळबळ. शेतकरी व नागरी समस्यांसाठी आझाद हिंद आक्रमक. आंदोलनाची त्वरीत दखल. आंदोलक अधिकाऱ्यांमध्ये दोन तास मॅरेथॉन बैठक...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधीः-
ओला दुष्काळ जाहीर करावा, पिक विमा व ईतर ज्वलंत नागरी समस्यांसाठी अधिका-यांचे कपडे काढण्याचा इशारा देत आझाद हिंदने बुलढाण्यात आक्रमक पवित्रा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश निदर्शने आंदोलना दरम्यान अधिकाऱ्यांची कपडे काढू असा इशारा दिल्यामुळे प्रशासनात खळबळ निर्माण झाली होती. त्यामुळे मागण्यांच्या पूर्ततेसाठी लगेच मॅरेथॉन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मागण्यांच्या पूर्ततेसाठी संबंधितांना निर्देशित केले. दरम्यान चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. नमूद मागण्यांमध्ये मोताळा, बुलढाणा तालुक्यातील असंख्य शेतकरी जाणीवपूर्वक पिकविम्या पासून वंचित ठेवले आहेत. पैशाची मागणी करणाऱ्या बोगस ईसर्वेची चौकशी करून कारवाई करावी. पिक विम्या पासून एकही शेतकरी वंचित राहता कामा नये. शहरातील साफसफाई न करना-या कंत्राटाची देयके थांबवावी. जिल्ह्यात डेंगू, मलेरिया, संसर्गजन्य साथ सुरू असतांना साफसफाई न करणाऱ्यांवर कारवाई करावी. अवैध धंदे बंद करावे. गहाळ झालेल्या महिला मुलींची आकडेवारी जाहीर करावी. अतिक्रमण धारकांना पर्यायी जागा द्याव्या. रोही रानडुक्कर मारण्याच्या पासेस त्वरित वाटप कराव्यात यासह ज्वलंत नागरी समस्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आले. आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. सतीशचंद्र रोठे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र आक्रोश व्यक्त करीत शासन प्रशासनाचे लक्ष वेधले. मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलनकर्त्यांसोबत संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित दोन तास मॅरेथॉन बैठक घेत मागण्यांच्या पूर्ततेसाठी संबंधितांना निर्देशित केले हे विषेश. मॅरेथॉन बैठकीला नगर विकास सहआयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी, गृह अधीक्षक यासह संबंधित प्रशासकीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अस्लम शाह, संजय एंडोले, सुरेखाताई निकाळजे, आशा गायकवाड, पंचफुला गवई, शेख अफसर, इमरान शाह आदींनी बैठकीत सहभाग घेतला.