logo

*जव्हार || दिन दयाळ उपाध्याय ग्रामिण कौशल योजना सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी भव्य रोजगार

जव्हार तालुक्यातील युवक व युवतींना विनामूल्य कौशल्याचे प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने जव्हार पंचायत समिती chya वतीने सौ. विजया लाहरे सभापती पंचायत समिती जव्हार यांच्या पुढाकाराने दिनांक २/८/२०२४ रोजी भव्य मेळावा पार पडला या मेळाव्यास तालुक्यातील २०० ते २५० युवक व युवतीं सहभाग नोदवला या मेळाव्यास उपस्थित पात्र युवक वा युवतींची कौशल्याच्या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. विनामूल्य दिले जाणारे प्रशिक्षण पूर्ण झाल्यास त्यांना खाजगी क्षेत्रात नौकरी उपलब्ध करून दिली जाणार आहे. दिन दयाळ उपाध्याय ग्रामिण कौशल योजना सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी भव्य रोजगार मेळावा आयोजित केला होता हा मेळावा संपन्न झाला. यावेळी उपस्थित प स जव्हार सभापती विजया लहारे, जि प सदस्या सुरेखाताई थेतले, उपसभापती दिलिप पाडवी, प स सदस्य सुरेश कोरडा, प.स.सदस्य चंद्रकांत रंधा, ज्योती बुधर, मिरा गावित, मंगला कान्हात, साहयक गटविकास अधिकारी येन्दे सर्व युवा बंधु भगिनी उपस्थित होते.

17
8128 views