logo

*भीम आर्मीच्या जिल्हा संघटक पदी अनिल शिकारे तर मोताळा तालुका महासचिव पदी मोहम्मद इकबाल खान यांची नियुक्ती



बुलढाणा:दिवसेंदिवस वाढतच असलेला अन्याय, अत्याचार,विरुद्ध वंचित शोषित पिढीला न्याय मिळवून देण्यासाठी सतीश भाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली भीम आर्मीचे बुलढाणा जिल्ह्यात कार्य जोमाने सुरू आहे.

त्याअनुषंगाने आज दि. 5/ 8/ 2024 सोमवार रोजी भीम आर्मी भारत एकता मिशन संस्थापक अध्यक्ष खासदार भाई चंद्रशेखर आझाद यांच्या कार्याचा संपूर्ण देशात सुरू असलेला झंझावात बघता बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सतीश दादा पवार यांनी अनिल शिकारे जिल्हा संघटक पदी तर मोताळा तालुका महासचिव पदी मोहम्मद इकबाल खान यांना नियुक्तीचे पत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले .

त्याप्रसंगी बोलताना भीम आर्मी संघटनेच्या माध्यमातुन समाज हित डोळ्यासमोर ठेऊन संघटन अधिक मजबूत करणार असल्याचे नवनियुक्त मोताळा तालुका महासचिव खान यांनी सांगितले.
दरम्यान निवडी नंतर अनिल शिकारे म्हणाले कि जिल्हाध्यक्ष सतिश दादा पवार यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याच विश्वासाने संघटना वाढीसाठी काम करणार असल्याचे सांगीतले.
त्यावेळी उपस्थित बाला भाऊ राऊत, अर्जुन भाऊ खरात, लाला भाऊ गवई, विजय दोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यांच्या निवडी बाबत त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करून अभीनंदन होत आहे.

22
8194 views