logo

शेगावात जडी बुटी दिवस साजरा

डॉ. जावेद हुसैन शाह (जिल्हा प्रतिनिधी )
शेगाव : पतंजली योग परिवार बुलढाणा जिल्ह्याच्यावतीने ४ ऑगस्ट हा दिवस 'जडीबुटी दिवस' म्हणून साजरा करण्यात आला.
अध्यक्षस्थानी चिन्मय विद्यालयाचे प्राचार्य किशोर कुलकर्णी होते. तर अतिथी म्हणून राष्ट्रीय कीर्तनकार हभप सुशील महाराज वनवे, डॉ. अभय गोयनका, समाजसेवक राजेंद्र शेगोकार, गो ग्रीन फाउंडेशनचे शेगाव अध्यक्ष विलास शेट्टे व भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी चतुर्भुज मिटकरी होते. प्रास्ताविक महाराष्ट्र पूर्वचे प्रांत सहकोषाध्यक्ष प्रल्हाद सुलताने यांनी केले. तसेच अतिथींनी जडीबुटी तथा वृक्षारोपण औषधीय वनस्पतीचे वाटप व रोपण यांचे महत्त्व विशद केली. वनश्री विठ्ठलराव मिरगे यांनी संचालन केले. कोषाध्यक्ष निळकंठ साबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमात मधुकर बगे, दिलीप इंगळे, सोशल मीडिया जिल्हा प्रभारी विनायक भारंबे, युवा जिल्हा प्रभारी हरिदास सोळंके, महामंत्री बाबूराव रोकडे, मनोहरराव पाचपोर, राजकुमारी भट्टड, वर्षा सरप उपस्थित होते. यावेळी पतंजली परिवारातील पदाधिकारी तथा योगसाधक, साधिका, गो ग्रीन फाउंडेशनची चमू, गुरुदेव सेवा मंडळाची टीमने सहकार्य केले.

10
2255 views