
" पूर्वीचे पुणे आता राहिले नाही "
एका काका व पुणेकरातील संवाद अवश्य वाचा...!
पुर्वीचे पुणे कसं होत.
पुणेकर - नमस्कार काका
काका - बोला काय हवयं ?
पुणेकर - पुणेकरांकडून सरळ उत्तर हवयं...!
काका - तुम्हांला ?
पुणेकर - अहो काका, आम्ही एक डॉक्युमेंटरी बनवतोय, तर तुम्ही मला सांगता का? पुर्वीचे पुणे कसं होत?
काका - पुणे कसं होत? चला तर ऐका
शेतकरी, कष्टकरी, वारकरी होते,
कलावंत, विचारवंत, बुद्धीवंत होते,
रसिक होते, प्रेक्षक होते, सारेच दर्दी होते,
मुळा-मुठा स्वछ होती, गल्ली-बोळ होते,
शिवनेरीसाठी लढणारे मावळे, शनिवारवाडा वाले होते,
भक्कम बांधकाम असणारे प्रशस्थ वाडे होते,
इंग्रजांशी भिडणारे क्रांतिकारी होते,
पुणे म्हणजे अपमान असे समीकरण नव्हते,
तर पुणे म्हणजे रसिकता असे गणितं होते,
काय सांगु बाळा ! आता यातलं काहीच उरले नाही,
म्हणूनच म्हणतात पूर्वीच पुणे आता राहील नाही...
पुणेकर - काय करायचं काका आता वेगळीचं क्रांती झाली,
लढणं-बिडण सोडा, आता जगण्याची भ्रांती झाली,
पुर्वी दौडले घोडे, तिथे आता पोर्शे गाडी फिरती,
सुखरूप घरी येईल की नाही, याची भीती मनामध्ये उरली,
दुपारी झोपणारे पुणे, आता रात्री सुद्धा झोपत नाही,
काय सांगू काका हे सारं आता खरचं झेपतं नाही,
स्वराज्यासाठी लढलेले, आता गडावरच्या पार्ट्या बघतं असतात,
कशासाठी लढले असतील? महाराज याची जाणीवसुद्धा राहिली नाही,
एकमेकांचं ऐकण्यासाठी सण सार्वजनीक केला गेला,
पण या डीजेंच्या भिंतीमध्ये आपलाच आवाज दाबला गेला,
नशीब काका तुम्ही पूर्वीचं पुणे पाहिलंय,
आठवणींत का असेना चांगलं पुणे राहिलंय,
ईतिहास घडवणारं पुणं आता इतिहासातच गेलंय,
" पूर्वीचे पुणे आता राहिले नाही "