
*
बदलापूरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावरील रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह!
बदलापूर ठाणे - बदलापूर मध्ये पूर्व व पश्चिमेला जोडणारा स्वातंत्र्यवीर सावरकर हा एकमेव उड्डाणपुल आहे पण या उड्डाणपुलावरील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे रस्त्यावरील जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करून गाडी चालवावी लागते गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याकडे गांभीर्याने घेत जात नसल्याने बदलापूर प्रवासी वर्गात नाराजी आहे
रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने 'रस्ता का मृत्यूचा' सापळा अशी परिस्थिती तयार झाली आहे पुलावरील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून प्रवासी व वाहन चालकांना हा रस्ता डोकेदुखी ठरत आहे खड्ड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने *खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा* हे बदलापूरकरांना अजून समजू शकले नाही या पुलावरून वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने डांबरीकरण नेहमीच उखडले जात आहे व हा रस्ता नगरपरिषदेच्या मुख्य कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर आहे बदलापूर पूर्व व पश्चिमेला जोडणारा मुख्य रस्ता असल्याने व्यापारी,दुकानदार,शेतकरी,शालेय विद्यार्थी व चाकरमान्यांना रस्त्यावरून जीवघेणी प्रवास करावा लागतो
तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी
काही दिवसापूर्वी या रस्त्यावरील खड्डयांना डागडुजी तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी करण्यात आली होती मात्र रस्त्याची परिस्थिती जैसे-थे आहे दरवर्षी पावसाळ्यानंतर या रस्त्याची मलमपट्टी केली जाते व काही दिवसानंतर पुन्हा खड्डे निर्माण होतात महिला प्रवासी रुग्ण यांना या रस्त्यावरून प्रवास करणे अवघड ठरत आहे खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात सुद्धा घडतात डांबर उखडून गेल्याने व रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक गोष्टीशी सामना करावा लागत आहे रस्ता कधी दुरुस्त होणार असे सवाल बदलापूरकरांनी नागरिक उपस्थित करत आहे