logo

मजरेहिंगोणे शाळेत "माझे नाव-माझे झाड" उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

मजरेहिंगोणे शाळेत "माझे नाव-माझे झाड" उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

चोपडा(प्रतिनिधी):- तालुक्यातील मजरेहिंगोणा जि.प. शाळेचे पदविधर शिक्षक योगेश सनेर यांच्या संकल्पनेतून एकाच दिवशी शिक्षक व विद्यार्थी पटसंख्येइतके "माझे नाव-माझे झाड" ह्या उपक्रमांतर्गत वृक्षरोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स.चे गटविकास अधिकारी आर.ओ.वाघ हे होते. प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी अविनाश पाटील, केंद्रप्रमुख उत्तम चव्हाण, मार्केट कमेटीचे संचालक नंदकिशोर सांगोरे, शाळा व्यवस्थान समितीच्या अध्यक्षा दिपाली बाविस्कर यांची उपस्थीती होती. प्रारंभी ईशस्तवन दिपप्रज्वलन प्रतिमापूजन करण्यात येऊन मान्यवरांचे यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक ग.स.चे संचालक योगेश सनेर यांनी केले.
कार्यक्रमाची सुरूवात झाडेच झाडे लावुयांत ह्या गीताने होऊन मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. गटविकास अधिकारी यांनी आपल्या मनोगतात पदवीधर शिक्षक व ग. स. संचालक योगेश सनेर यांनी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी वैयक्तिकरित्या सुमारे वीस हजार पर्यंत खर्च करून सामाजिक बांधिलकी जोपसली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढलेत. गटशिक्षणाधिकारी यांनी शाळेत उपयुक्त देशी वड, पिंपळ, निंब, जांभूळ अश्या झाडांची लागवड केल्यामुळे शाळेचा परिसर निसर्गरम्य होऊन पर्यावरणाचा समतोल राखला जाईल असेही सांगितले. याप्रसंगी नुकतेच पदोन्नती झालेले दिनेश चौधरी, कपिला पाटील, विलास पाटील, डॉ. उज्ज्वला देसले, परदेशात शिक्षणासाठी निवड झालेले शुभम देवरे यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वैशाली पवार यांनी तर आभारप्रदर्शन प्रमोद देवरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी धनराज बोरसे, मोनेश बाविस्कर, मनीषा पाटील ग्रामसेवक के. बी. कोळी यांनी विशेष प्रयत्न केलेत.

0
3998 views