logo

शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्याचे करियर कौन्सिलिंग महत्त्वाचे ! - विनायकराव पाटील

कवठा - दयानंद विद्यालयात दि. 1 ऑगस्ट रोजी बाळगंगाधर टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याची जयंती मोठ्या उत्साहाने
साजरा करण्यात आली.
या प्रसंगी कवठा गावाचे थोर समाजसेवक विनायकराव पाटील, दयानंद शिक्षण संस्थेचे विजयकुमार सोनवणे, शिवाजीराव पाटील,माऊली महाराज साखर कारखान्याचे संचालक सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थीतीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला. महापुरुषाच्या जयंतीचे औचित्य साधून, दयानंद विद्यालयाच्या वतीने सर्वाधीक गुण घेवून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकाचा, प्रमुख पाहूण्याच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी विनायकराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शिवाजी विद्यालय किल्लारी येथील 89.00 टक्के गुण घेवून उत्तीर्ण झालेली,कांबळे आचल राजेद्र तसेच,93.837. गुण घेवून केंद्रात प्रथम आलेली कवे मेघा राजेंद्र 12 वी ची विद्याथींनी, सोनवणे मयूरी महादेव 86.67.%गुण, तसेच यशवंतराव चव्हाण विद्यालय पेठ सांगवी येथील विद्यालयाचे विध्यार्थी,पाटील भक्ती चंद्रकात 94.60%. मुळे श्रेया सुरेश 91. 40 टक्के.शिंदे संभाजी हणमंत 91.40%टक्के गुण . तसेच दयानंद विद्यालयाचे विद्यार्थी, सोनवणे आरती तानाजी 97.40% गुण. सोनवणे प्रगती प्रशांत 96.80 टक्के गुण. पाटील श्रुती प्रवीण 95.60% गुण घेतलेल्या या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कवठा गावचे सुपुत्र, राजश्री शाहू महाविद्यालय लातूर या ठिकाणी प्रयोगशाळा सहाय्यक या पदावर कार्यरत असलेले, परमेश्वर शिंदे यांनी, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, हा उदात्त हेतू ठेवून शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा करिता खेळाडूंसाठी आवश्यक असलेले क्रीडा पोशाख, दयानंद विद्यालयास उदार अंतकरणाने भेट देऊन, खेळाडू विद्यार्थी आणि क्रीडा शिक्षक यांना ऊर्जा मिळवून दिली. यावेळी उपस्थित प्रमुख अथीतीने,परमेश्वर शिंदे यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले.
इतरांना मदत करण्याची वृत्ती ही मुळात कवठा गावच्या मातीतच उपजली असून, कवठा गावातील आदरणीय कैलासवासी विठ्ठलराव पाटील, कैलावासी आनंदराव पाटील, कैलासवासी स्वातंत्र्यसेनानी धोंडीराम आप्पा सोनवणे, याच्यापासून प्रेरित असलेले विनायकराव पाटील, विजयकुमार सोनवणे यांच्यासारख्या समाजसेवेची वृत्त घेतलेल्या विभूतींची,मदत करण्याची परंपरा परमेश्वर शिंदे यांच्या कार्यातून,पुन्हा जागृत झाल्याचे प्रमुख पाहुण्यांनी गौरव उदगार काढले.
यावेळी थोर समाजसेवक आदरणीय विनायकराव पाटील, उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष,विजयकुमार सोनवणे, उमरगा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन,नानाराव भोसले, मारुती महाराज साखर कारखान्याचे संचालक,सचिन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
विनायकराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून, प्रत्येक शाळा मधून अनेक गुणवंत विद्यार्थी उत्तीर्ण होतात, पण त्यांना पुढील दिशा ठरवण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते. त्यासाठी कॉन्सिलिंगची नितांत आवश्यकता असल्याचे सांगितले. विनायकराव पाटील यांचे या मताला, विजयकुमार सोनवणे यांनी आपल्या भाषणातून दुजेरा देत,आपण प्रत्येक शाळेतून एका विशेष कॉन्सिलरला बोलवून शाळेत, एक तासाचा कौन्सिलिंग पिरियड ठेवणार असल्याचे सांगितले, जेणेकरून विद्यार्थ्यांना भविष्यात योग्य मार्गदर्शन होऊन, ते त्यांच्या पुढील शिक्षणासाठी दिशादर्शक ठरेल.
मारुती महाराज साखर कारखान्याचे संचालक सचिन पाटील यांनी आपल्या भाषणातून, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांचे जीवन चरित्र विद्यार्थ्यांसमोर मांडले.
यावेळी विद्यार्थ्यांचीही भाषणे झाली.
गावातील प्रतिष्ठित शिवाजीराव पाटील, मारुती महाराज साखर कारखान्याचे संचालक सचिन पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन नानाराव भोसले, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बाबुराव गायकवाड, माजी मुख्याध्यापक निळकंठ सुतार- पाटील, यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, श्री शिवाजी विद्यालय किल्लारी चे शिक्षक रामराजे सूर्यवंशी व विद्यार्थी, दयानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक पितांबर कांबळे ,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी, गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक, माजी सैनिक दादासाहेब कांबळे,गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयानंद विद्यालयाचे घोडके सर यांनी केले,तर आभारप्रदर्शन माळी सर यांनी केले.

दिग्गज जनता न्यूज.

9
3039 views