logo

आगामी विधानसभा निवडणुकी चा संबंधित बैठक...

(प्रतिनिधी) तुमसर: येथे आगामी विधानसभा निवडणुकी चा संबंधित सन्माननीय. राज साहेब ठाकरे यांचा आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मा.नगराध्यक्ष सरचिटणीस वैभव खेडेकर आणि महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अखिल चित्रे.यांचा प्रमुख उपस्थित गोवर्धन नगर शाखा क्रमांक एक येथे बैठक पार पाडण्यात आली.
विधानसभा निवडणुकीसाठी भंडारा जिल्ह्यातील सर्व तीन जागा लढवण्याची तयारी मनसे कडून सुरू करण्यात आली आहे त्यासाठी मतदार संघ निहाय सर्वेक्षण करण्यात आले असून त्याच्या अहवालही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, विधानसभा निवडणूक महायुतीऐवजी स्वबळावर लढविण्याची चाचपणी मनसेकडून सुरू झाली आहे. राज्यातील प्रमुख शहरांत मनसेकडून उमेदवार दिले जाणार आहेत. त्यादृष्टीने तुमसरातही मनसेकडून निवडणूक तयारी सुरू करण्यात आली आहे.
यावेळी बैठकीला मनसे जिल्हाध्यक्ष नितीन वानखडे,जिल्हा उपाध्यक्ष शैलेश गजभिये,तुमसर तालुका अध्यक्ष ईशांन शेंद्रे,शहर अध्यक्ष निखिल कटारे, शहर उपाध्यक्ष पुष्पक त्रीभूवणकर,शहर सचिव दीपक सराटे,विभाग अध्यक्ष जितू भवसागर,विभाग अध्यक्ष सागर शनीचरे,वी.अ मनीष गुर्वे,शाखा अध्यक्ष धम्मदीप सूर्यवंशी,आशिष सांडेल महेश इनवते, अनिल बागडे,मेहताप शेख,योगेश कुंभरे,आकाश बडवाईक,कुणाल नेवारे, कुणाल मेश्राम अंकित पोहबे दुर्गेश कामथे,दुर्गेश लांजेवार,मनीष राणे,आर्यन शिवरकर,महेश भुरे, लोकेश लसुंदे ,रोहित शिवणकर व सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते

12
2632 views