logo

ग्राम पंचायत बंद अधिकार वर्गाचा लक्ष नाहि

------------------------------------
===================
*मुरादपुर ग्रामपंचायत पुन्हा बंद स्थितीत*
*कर्मचारी,डाटा एंट्री ऑपरेटर यांना निलंबित करावे*
*वरिष्ठांचा कर्मचारी वर्गावर दबाव नाही.*
*असे अनेक ठिकाणी प्रकार घडत आहेत.*
*अनेक बातम्या प्रसिद्ध होऊन ही कर्मचारी बिनधास्त*

*अशा कर्मचारी वर्गाचे वेतन अदा करू नये*
*तक्रारी करूनही तीच अवस्था असून लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे*

ग्रामपंचायत ही विकासाचा कणा असून तो सध्या मोडलेल्या अवस्थेत असून एक प्रकारे दुकानाचे स्वरूप आलेले आहे.
अनेक वेळा तक्रार करूनही त्यावर कार्यवाही होत नसेल तर अशा ग्रामपंचायतींना माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ संगमेश्वर तालुक्याचे वतीने दिनांक 05 ऑगस्ट 24 रोजी टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
विकासाचा कणा असलेल्या ग्रामपंचायती मध्ये कामात पारदर्शकता यावी.याकरिता वारंवार सी सी टिव्ही यंत्रणा,बायो मेट्रिक यंत्रणा बसविण्यासाठी तक्रारी,निवेदने करूनही वरिष्ठ अधिकारी कोणतीही कारवाई करीत नसून संबंधित कर्मचारी वर्गाला पाठीशी घालत आहेत. शासनाचे आदेश असूनही कोणतीही कार्यवाही करण्यात येत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
लोकांना जनतेला वेठीस धरले जात आहे.बातम्या प्रसिद्ध होऊनही लोक प्रतिनिधींचे लक्ष नाही याची चर्चा सुरू आहे. आश्चर्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते असूनही त्यांना पाठीशी घालून आपली कामे करून घेत असल्याने आपला दबाव रहावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
असे रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच संगमेश्वर तालुक्यातील अनेक प्रश्न असून दिनांक 15 ऑगस्ट 24 रोजी आमरण उपोषणाचा इशारा माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य चे रत्नागिरी व संगमेश्वर वतीने इशारा देण्यात आला आहे.
याबाबत रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव व संगमेश्वर तालुका अध्यक्ष शेखर जोगळे यांनी सांगितले आहे.
==

2
4053 views