महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक घर झालीत जमीनदोस्त
महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकरी तसेच सामान्य माणसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र समोर आले आहे .
जिल्ह्यात सतत येत असलेला मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागांतील अनेक मातीचे घर जमीनदोस्त झाले आहेत, त्याचप्रमाणें सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे धान पीक पाण्यात वावून गेल्याची घटना समोर आलेली आहे. त्यामधे तुमसर तालुक्यातील ग्रामिन भागांतील शेतकरी आणि पूरग्रस्त जनतेनी शासनाकडून पीडितांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी ह्यासाठी मागणी केली आहे.परिसरात कोणतीही जीवित हानी झालेली नाही .