logo

धान्य दुकानदारांना दर्जेदार ई-पॉस मशीनचा पुरवठा करण्यात यावा ! अन्यथा केवायसी कामावर बहिष्कार,

डॉ. जावेद शाह
शेगाव(ता.प्र) रेशन दुकानातील ईकेवायसी आधार सत्यापण करावे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लागत आहे. धान्य वितरणासाठी रास्त धान्यदुकानदारांनी ई- पॉस मशीन बायोमेट्रिक पद्धत अवलंबली आहे. या मशीनचा सर्व्हर सातत्याने बंद राहत असल्याने लाभधारक ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
यामुळे दुकानदार आणि ग्राहकांमध्ये वाद सुध्दा होत आहेत. हे प्रकार टाळण्यासाठी दर्जेदार ई-पॉस मशीनचा पुरवठा करावा, किंवा इ-के वा य सी चे काम इतर सेवा सुविधा केंद्रा मार्फत करण्यास परवानगी द्यावी.अशी मागणी शेगाव तालुका रेशन दुकानदार संघटनेने तहसीलदारां मार्फत मा.जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाव्दारे केली आहे.जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या नावाने पाठविण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की धान्य दुकानातून ग्राहकांना धान्य वितरण व ई केवायसी नोंद ही पोस्ट मशीनद्वारे करण्यात येत आहे.
मात्र सर्वरमध्ये वारंवार प्रॉब्लेम येत असल्याने रेशन दुकानदार व कार्डधारक यांच्यामध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत अनेक वेळा हे प्रकरण हाणामारी पर्यंत पोहोचलेले आहेत त्या कारणाने रेशन धान्य दुकानदारा विरोधात असंतोष निर्माण होताना दिसत आहे.
याबाबत ठोस पर्याय काढण्यात यावा तसेच इ के वाय सी चे काम इतर सेवा केंद्र मार्फत करण्यास परवानगी देण्यात यावी आधी मागण्या करण्यात आल्या आहेत अन्यथा ही केवायसी कामावर बहिष्कार घालण्याचा इशाराही या निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.
ग्राहकांना आपले धान्य मिळवण्यासाठी रेशन दुकानावर रोज चकरा माराव्या लागतात,आता कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे सद्या आधार सत्यापण करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे मात्र सर्व्हर डाऊन राहत असल्याने दुकानदार व ग्राहकांत सातत्याने वाद होतात.
महिन्याचे शेवटचे दिवस असल्याने रेशनचे धान्य घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत.महिनाभरापासून लाभार्थ्यांना धान्य न मिळाल्याने अनेक समस्यांचाक्षसामना करावा लागतो आहे. ग्राहक दिवसभर दुकानासमोर उभे राहून मशीन चालू होण्याची वाट पाहत असतात आणि सायंकाळी दुकान बंद झाले की रिकाम्या हातांनी घरी परततात. यामुळे ग्राहकांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे.
तरी दर्जेदार ई-पॉस मशीनचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी सुद्धा निवेदनात करण्यात आली आहे.निवेदन देताना स्वस्त धान्य संघटनेचे शेगाव शहराध्यक्ष मंगेश देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष विजय भालतीळक, दीपक धमाल, विनोद लांजुळकर, सोनू मोहोळ ,जि.ओ काळे, मोहन धनोकार, मंगेश ढोले, अक्षय देशमुख ,गोपाल पल्हाडे व इतर उपस्थित होते.

7
1727 views