
आळंदी देवाची :श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पादुका थेट मलेशियात "रामकृष्णहरी चा गजर मलेशियात"....
श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांनी महाराष्टातून पंजाब पर्यंत भागवत धर्माची पताका व शांतीचा संदेश घेऊन गेले.
भक्तिपथ सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून विश्व भ्रमण दिंडी मलेशिया 2024🚩
ला नामदेव महाराजांच्या पादुका नेऊन त्या ठिकाणी समाधी सोहळा आयोजित केला आहे, त्या निमित्ताने मलेशिया मध्ये 251 ज्ञानेश्वरी ग्रंथ वाटप करणार आहे,,
राधे राधे,,,राम कृष्ण हरी,, 🚩🙏विश्वभ्रमण दिंडी समिती आळंदी देवाची पुणे आयोजित मलेशियामध्ये श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा समाधी सोहळा साजरा करून भागवत धर्माचा झेंडा संपूर्ण विश्वात पोहचवण्याचे कार्य विश्व्भ्रमण दिंडी मार्फत होत असून 51देशामध्ये आपल्या सर्व संतांचे विचार घेऊन जाणार आहेत, मागच्या वर्षी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पादुका थेट दुबईला नेऊन तिथे समाधी सोहळा साजरा केला होता,याचप्रमाणे उद्या दि 29-07-2024 वार -सोमवार माऊली मंदिरात श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन व नगर प्रदक्षिणा करून मुंबई विमानतळावरून मलेशियाला जाणार आहे त्यापूर्वी आळंदीमध्ये स्वामी भारतानंद सरस्वती महाराजांचे कीर्तन श्री जगदीशजी चव्हाण, श्री रामेश्वरजी डांगे व गायत्री गायकवाड यांचा भजनाचा कार्यक्रम होईल,मलेशियामध्ये कार्तिकस्वामी मंदिरात वारकरी कीर्तन, भजन, संगीत कार्यक्रम, ग्रंथ वितरण आणि इंटरनॅशनल पुरस्कार वितरण होणार आहे..आता "रामकृष्ण हरी" चा गजर थेट मलेशियात होणार आहे.या दिंडीचे आयोजक श्री शेषराव महाराज आळंदीकर यांच्यासह उपाध्यक्ष श्री दीपक चव्हाण सोबत सचिव श्री हनुमान घोंगडे व विशेष सल्लागार अड.निलेश आंधळे यांनी केले आहे.जगात महाराष्ट्रातील थोर संतांचे विचार पोहचून जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी विश्वभ्रमण दिंडी खुप छान कार्य करत आहे.
राधे राधे,,,राम कृष्ण हरी,, 🚩🙏