logo

"शिक्षण सप्ताह उपक्रमांतर्गत शाळांमध्ये तिथी भोजन (स्नेहभोजन ) उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांच्या स्नेहभोजनासाठी दानशूर व्यक्ती शोधा! -शिक्षण संचालकांचे आदेश

चंद्रपूर : केंद्र शासन निर्देशानुसार संपूर्ण देशभरात दि. 22 ते 28 जुलै 2023 या दरम्यान "शिक्षण सप्ताह" या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख सचिवांच्या वरील पत्रानुसार आदेश निर्गमित केले असून प्रमुख कार्यप्रणालीची अंमलबजावणी संबंधित स्तरावर करण्याची व्यवस्था शाळांमध्ये करावी. या "शिक्षण सप्ताह" उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रमुख दिवसांपैकी एक दिवस "समुदाय सहभाग दिवस" म्हणून साजरा करण्यात यावा. या दिवसाच्या माध्यमातून गावातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने "तिथी भोजन (स्नेहभोजन)" उपक्रम राबविण्यात यावा.
या उपक्रमांतर्गत पूर्ण जेवण, मिठाई किंवा पौष्टिक आहार (उदा. मोड आलेली कडधान्ये, शेंगदाणे, सुका मेवा (काजू, बदाम, पिस्ते, मनुका, अक्रोड, बेदाणे), फळे, शिजवलेले पदार्थ, मिठाई) इत्यादींचा समावेश असलेले अन्न विद्यार्थ्यांना देण्यात यावे, असे आदेश गोसावी यांनी दिले आहेत. भोजनात कोणत्या पदार्थाचा समावेश करावा याबाबत शाळा व्यवस्थापन समितीने व देणाऱ्या व्यक्तींनी परस्पर सहमतीने एकत्रित निर्णय घ्यावा. वरणाच्या पदार्थ (जंक फूड) शिजवून देऊ नये, असे स्पष्ट केले आहे. त्या मुळे मुख्याध्यापकांना दानशूर व्यक्तीचा शोध घेणे हे एक तारेवरची कसरत.

68
20385 views