logo

कल्याण बुडाले तर कोण जबाबदार? शिवसेना आमदार केडीएमसी अधिकाऱ्यांवर संतापले.

कल्याण- तुम्हाला काय ? लोक आम्हाला विचारतात. कल्याण बुडाले तर काय ? असा संतप्त सवाल शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना केला आहे. आमदार भोईर यांनी नालेसफाईची पाहणी केली. या पाहणी दरम्यान नालेसफाई झाली नसल्याने आमदारांनी संताप व्यक्त केला. पुन्हा येत्या गुरुवारी नालेसफाईच्या कामाची पाहणी करणार आहे. नालेसफाई झाली नाही तर अधिकारी आणि कंत्राटदाराची गय केली जाणार नाही असा सज्जड इशारा आमदारांनी दिला आहे.

106
4845 views