logo

हॉटेल तिरूमला वर अवैध देशीदारू विक्रेत्यावर नांदुरा पोलिसांचा छापा


नांदुरा:- दिनांक २४ जुलै २०२४ रोजी पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस स्टेशन नांदुराचे डीबी पथकातील अंमलदार जवंजाळ वराडे ससाने मानकर झगरे भोजने हे नांदुरा हद्दी मध्ये दारूबंदी व जुगार कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाया करणे कामी पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहिती प्रमाणे
वडनेर येथे हॉटेल तिरुमल्ला वर सागर प्रतापसिंग देशमुख वय ३४ वर्ष राहणार वडनेर भोलजी हा इसम अवैधरित्या विनापरवाना देशी दारु विक्री करण्याचे उद्देशाने एका थैलीमध्ये ९० एम एल मापाच्या टॅंगो पंच देशी दारूच्या २३ नग शिष्या थैली सह किमती ८१५/- रुपयाच्या जवळ बाळगताना मिळुन आला
मोमिनाबाद येथील हॉटेल राजवाडा समोर सार्वजनिक ठिकाणी अजय दिनकरराव काळे वय ५० मोमिनाबाद हा अवैधरित्या दारू विक्री करताना मिळून आला त्याचे ताब्यात देशी दारू टॅंगो पंच १८० मिली च्या १३ नग ९१० विदेशी बियर कॅनोन १००००.३३० मिली च्या ८ नग शिष्या ७६० विदेशी दारू रॉयल स्टेग १८० मिली च्या ६नग शिष्या २०८०/- एक वायर थैली २०/- असा एकूण २७७०/-- रू चा प्रोव्ही माल मिळून आला
नमूद आरोपी विरुध्द दारूबंदी कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे

3
7534 views