logo

प्रधानमंत्री शालेय पोषण आहार स्वयंपाक तथा मदतनीस कष्टकरी कामगार एकता संघ महाराष्ट्र राज्य विविध मागण्यांचा तहसील कार्यालय येवला येथे धडक महामोर्चा

प्रतिनीधी येवला
प्रेस नोट 19 जुलै, शुक्रवार रोजी प्रधानमंत्री शालेय पोषण आहार स्वयंपाकीन तथा मदतनीस कष्टकरी कामगार एकता संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने विविध मागण्यांसाठी येवला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चासाठी येवला तालुक्यासह अनेक तालुक्यातून संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह अनेक स्वयंपाकी व मदतनीस कर्मचाऱ्यांनी या मोर्चामध्ये सहभाग सहभागी झाल्या होत्या,संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री. शरद लोहकरे सर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता माऊली लॉन्स विंचूर रोड येथून मोर्चाला सुरुवात झाली, मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयावर मोर्चा आला. संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे पत्र देण्यासाठी बोलण्यात आले , मंत्री छगन भुजबळयांच्या वतीने स्वीय सहाय्यक श्री. लोखंडे साहेब यांना निवेदन देण्यात आले, व त्यांनी हे पत्र साहेबाकडे पोहोच होईल याची शाश्वती दिली,

त्यानंतर मोर्चा विंचूर चौफुली येथे आल्यानंतर डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मोर्चा तहसील कार्यालयावर गेला. मोर्चामध्ये विविध तालुक्यातून संघटनेचे अनेक पदाधिकारी तसेच स्त्रिया व पुरुषांनी अतिशय उत्स्फूर्तपणे भाग घेतला. विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन तसेच थाळी नाद करत मोर्चा तहसील कार्यालयावर आला. तहसील कार्यालयावर संघटनेचे पदाधिकारी यांनी आपापले मागण्या व्यक्त केल्या केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री शरद लोहकरे सर यांनी कर्मचाऱ्यांना, किमान 15000 रुपये वेतन द्यावे, त्यांना युनिफॉर्म द्यावा,वीस लाखाचा विमा संरक्षण द्यावे, तर राज्य प्रमाणे यांना शासकीय सामावून घेणे यावेळी,विनाकारण कोणत्याही कर्मचाऱ्यास कामावरून काढू नये, कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधन खूप कमी आहे ते वाढवण्यात यावे,या सह अनेक मागण्या, यावेळी लोहकरे सर यांनी सांगितले

लाडकी बहीण ही योजना आणली आहे. मग ह्या स्त्रिया तुमच्या बहिणी नाहीत का? यांना केवळ 84 रुपये प्रति दिवसावर का राबावं लागतं ,
विविध मागण्यांचे पत्र तहसीलदार येवला यांना देण्यात आले पण, पत्र घेण्यासाठी प्रांताधिकारी उपस्थित नव्हते ही खंत ही त्यांनी व्यक्त केली, सामजिक कार्यकर्ते महेंद्र भाउ पगारे यांनी मोर्चास जाहिर पाठिंबा दिला ,मोर्चासाठी महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग होता, मोर्चासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य व कर्मचारी उपस्थित होते

25
7191 views