logo

देठ की हो हिरवा

हॅट्स ऑफ चे *देठ की हो हिरवा* हे दोन अंकी नाटक आता लवकरच रंगमंचावर येत आहे. नाटकाच्या नावावरूनच ते प्रचंड चावट किंवा विनोदी असावे, हे लक्षात आलेच असेल. तिन्हीसांजा चित्रपटाचे पुरस्कार विजेते दिग्दर्शक उल्हास आढाव यांनी हे नाटक दिग्दर्शित केले असून नाटकाचे लेखन प्रथितयश लेखक प्रदीप तुंगारे यांनी केले आहे. नाटकामध्ये प्रमुख भूमिका राजेंद्र देशपांडे, मानसी देसाई व उल्हास आढाव यांच्या तर सहाय्यक भुमिका कौशल धर्मे, मधुसूदन देसाई, नेहा बोरकर, प्रचिती देशपांडे यांच्या आहेत. नेपथ्य गिरीश सांगळे यांचे असून संगीत शरद हुकेरी यांचे आहे. *हॅट्स ऑफ* या निर्मिती संस्थेचे हे नाटक साज सरगम यांच्या प्रस्तुतीने लवकरच स्टेजवर येत आहे. पन्नाशीनंतर प्रत्येक पुरुषाला आपल्या बायको मधले दोष काढून दुसऱ्या स्त्रियांच्या बाबतीत तुलना करण्याची सवय असते. तसे म्हटलं तर लग्नाला पंचवीस वर्षे झाली की बायकोचा कंटाळा येणारे बरेच पुरुष समाजात आहेत. नवरा किंवा बायको कडून जोडीदाराच्या काही अपेक्षा नक्कीच असतात आणि मग त्या पूर्ण करण्यासाठी आटापिटा करणारेही लोक असतात. त्यातून घडणारे विनोद आणि मग एखाद्या तरुण मुलाची एन्ट्री यातूनच हे विनोदी नाटक साकारले गेले आहे. हे दोन अंकी नाटक निखळ करमणूक करून जातेच पण उत्तम संवाद, अभिनय आणि उत्तम दिग्दर्शन हे सुद्धा अनुभवायला मिळते.
जरूर बघावे असे हे नाटक "देठ की हो हिरवा".

12
5917 views