logo

आनंददायी शनिवार ने विद्यार्थी उत्साहित*

रायपूर प्रतिनिधी सादिक शाह

*आनंददायी शनिवार ने विद्यार्थी उत्साहित*
पिंपळगाव सराई:-स्थानिक जनता विद्यालय पिंपळगाव सराई हे नाविन्य पूर्ण उपक्रम घेणारे विद्यालय म्हणून नावारूपास येत आहे. शासनाने सुरू केलेला आनंददायी शनिवार विद्यार्थ्यांना अधिका अधिक शाळेकडे आकर्षित करीत आहे.आनंददायी शनिवारच्या निमित्ताने दप्तर मुक्त शाळा तसेच शाळेमध्ये विविध उपक्रम घेण्याचे शासनाने निर्धारित केले आहे त्याचाच एक भाग म्हणून जनता विद्यालय मध्ये आज आनंददायी शनिवार विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने अति उत्साहात संपन्न करण्यात आला.
सकाळच्या झालेल्या परिपाठा मध्ये विद्यार्थ्यांना एकाग्रता येण्यासाठी विद्या भारतीची संपूर्ण प्रार्थना,आनापना तसेच ओम च्या उच्चार घेण्यात आला शाळेचे पर्यवेक्षक तथा क्रीडाशिक्षक यांनी आज भारतीनाट्यम यांच्या विविध प्रकारच्या आनंददायी कृती या संगीताच्या तालावर विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या त्यासाठी कलाशिक्षक श्री खानंदे सर यांनी बासरीची तर ज्येष्ठ शिक्षक सुदामजी चंद्रे सर यांनी तबल्याची साथ दिली.विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
त्यासोबत आज शाळेमध्ये सर्पमित्र आशिष पाटोळे, प्रमोद सोनुने प्रेम मोरे, रूक्षी काळे जिवण सोमासे, व विदयालयामधील विदयाथीनी प्रियंका ‌सोनूने , प्रतिक्षा मोरे यानी सूधा प्रत्यक्ष त्याचा हातात साप पकडूण हिम्मत दाखवली व याचा मित्र परिवार यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे साप यांचे प्रत्यक्ष दर्शन दिले व साप हा शेतकऱ्यांचा शत्रू नसून मित्र कसा आहे हे पटवून सांगितले. सदर कार्यक्रमांमध्ये विद्यालयाचे विज्ञान शिक्षक श्री कुलकर्णी सर यांनी सुद्धा सापाच्या विविध जाती यांच्या विषयी सविस्तर माहिती देऊन फक्त तीन प्रकारचे साप असे आहेत की ते माणसाला विषबाधा करू शकतात परंतु पर्यावरण रक्षणासाठी किंवा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सापाचे महत्त्व त्यांनी आपल्या भाषणामधून सांगितले. त्यानिमित्ताने गावातील प्रतिष्ठित पत्रकार गणेश मोरे हे हजर होते.
आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयाचे प्राचार्य प्रमुख ठोंबरे यांनी पुढील सप्ताह मध्ये जो शिक्षण सप्ताह साजरा करायचा आहे या सप्ताह मध्ये आठवड्याचे प्रत्येक दिवस हा विविध उपक्रमासाठी निर्धारित केलेला आहे. त्याविषयी प्रत्येक दिवसाची अभ्यासपूर्ण माहिती दिली व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना न्याय मिळण्यासाठी आपल्याला हा सप्ताह अतिशय दर्जेदार साजरा करायचा आहे. याविषयी सर्व शिक्षक बंधू व विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे असे आव्हान केले.
शाळेतील प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे माननीय अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे तसेच सचिव प्रेमराजजी भाला यांचे आम्हाला मार्गदर्शन लाभत असते.
आजच्या या सर्व कार्यक्रमासाठी शाळेची सर्व शिक्षक प्राध्यापक कर्मचारी बंधू-भगिनी यांनी सहकार्य केले.

63
5130 views