logo

क्रीडा शिक्षकांची सभा २०२४-२५...



(तुमसर) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा व तुमसर तालुका क्रीडा परिषद यांच्या तर्फे तालुकास्तरीय क्रीडा शिक्षक यांची सभा फादर एग्नेल स्कूल तुडका- तुमसर येथे पार पडली सभेची अध्यक्षा माननीय लतिका लेकुरवाडे जिल्हा क्रीड़ा अधिकारी भंडारा जिल्हा, श्री निखिलेश तबाने क्रीड़ा अधिकारी व श्रीआकाश गायकवाड क्रीडा अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित सभेचे आयोजन करण्यात आले सभेमध्ये तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धाचे नियोजन व आयोजन आणि विविध विषयावर चर्चा करण्यात आली सभेचे संचालन श्रीमती अर्चना रामटेक फादर एग्नेल स्कूल यांनी केले व आभार श्री सुधाकर कहालकर सर मुख्याध्यापक म.ज्योतिबा फुले विद्यालय माडगी यांनी केले.

15
6334 views