logo

डॉ. अजित बागमार यांना नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार


नाशिक येथील सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ डॉ. अजित बागमार यांना नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जागतिक रेकॉर्ड एरा वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मनीष शर्मा यांनी जाहीर केला आहे. सदर पुरस्कार दिनांक 17 जुलै 2024 रोजी नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवसानिमित्त दिल्ली येथे देण्यात येणार आहे.
डॉ. अजित बागमार यांनी महाराष्ट्र ज्ञानदीप मंडळातर्फे 1001 सामुदायिक विवाह चे आयोजन केले होते. डॉ. अजित बागमार अखिल भारतीय मारवाडी गुजराती मंचचे अध्यक्ष व दैनिक उलाढाल आणि दैनिक नशिकनामा या वृत्तपत्राचे चे माजी संपादक असून नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटना, यंग ग्रुप ऑफ नाशिक, महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान, महाराष्ट्र ॲक्युप्रेशर व न्यूट्रिशनचे अध्यक्ष आदी पदावर राहून विविध सामाजिक संस्थेत कार्यरत आहेत. स्वतःचा विचार न करता सर्वाधिक बहुजन समाज व धर्मांना एकत्र येऊन सर्व धर्मीयां करिता निसर्गोपचार तसेच इतर अनेक सामाजिक क्षेत्रातून भरीव कामगिरी करत मोठे योगदान देत आहे.
डॉ. अजित बागमार यांना नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल माजी समाज कल्याण मंत्री बबनरावजी घोलप, आमदार सीमा हिरे, ॲड. नितीन ठाकरे, गजानन शेलार, आकाश छाजेड, चांदमल भन्साळी, सुधाकर बडगुजर, गणपत कोठारी, तसेच नाशिक येथील सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ डॉ संजय नाईक आदींनी शुभेच्छा व्यक्त केले आहेत.

43
4433 views