मुंबईत गिरणी कामगारांचे ९ ऑगस्ट पासून बेमुदत आमरण उपोषण
गिरणी कामगारांचा प्रश्न गेले ४२ वर्ष प्रलंबित असुन नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र शासना कडून काही निर्णायक भुमिका घेतली जाईल अशी अपेक्षा गिरणी कामगार व वारस यांना होती परंतु संपुर्ण अधिवेशनात कोणत्याही प्रकारचे समाधान कारक निर्णय गिरणी कामगारांच्या बाबतीत घेण्यात आलेले नाहीत त्यामुळे गिरणी कामगारांमध्ये सरकार विरोधात तिव्र असंतोष निर्माण झालेला आहे. राज्य सरकार आपली वारंवार आश्वासन देऊन फसवणुक करत आहे अशी भावना कामगारांची झाली आहे. या अन्याया विरोधात गिरणी कामगार /वारस ९ ऑगस्ट २०२४ पासून न्याय मिळत नाही तोपर्यंत मुंबईमध्ये आमरण उपोषण करणार आहेत.आता आश्वासन नको निर्णय घ्या तेव्हाच उपोषण मागे घेणार , एकतर सर्व गिरणी कामगारांचे मुंबईत मोफत पुनर्वसन करा अन्यथा आमच्या अंत्यविधीला अवश्य या हि भुमिका घेऊन कामगार /वारस या निर्णायक लढ्यात उतरणार आहेत.