logo

अवसरी खू. मागासवर्ग जमीन लुबाडली बाबतचा तक्रारी अर्ज पीडित ने अधिवेशनात ग्रह मंत्री व मुख्यमंत्री यांना दिला व या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून जमीन लुबाडणारे एजन्ट व त्यांना मदत करणारे महसूल अधिकारी यांच्या वर कार्यवाही करण्याची विनंती केली आहे...

सविस्तर बातमी -
पुणे जिल्ह्यातील अवसरी खू. येथील मागास्वर्ग शेतकऱ्यांची जमीन गावातील जमीन एजन्ट शिवाजी व नवनाथ बाबूराव भोर व इतर तसेच गौरव मोहन भोर व शिवराज सुरेश भोर व इतर यांनी तलाठी व सर्कल यांना पैसे देऊन नोंदी बदलून जमीन लुबाड ली आहे. जबरदस्ती ने गुंड आणून समजूता करार वर पीडित ची सही घेतली. व जमीन वर तार कुंपण टाकून ताबा टाकला. या सर्वावर हि जमीन लुबाडणे प्रकरणे घोडेगाव दिवाणी न्यायलयात गुन्हा दाखल केलेला आहे. न्याय प्रक्रिया ला उशीर लागणार आहे. यांच संदीचा फायदा एजन्ट घेऊन हि जमीन एजन्ट प्लॉट करून विक्री करणार. शेतकरी ला आता कुणाकडे न्याय मागावा असे झाले आहे. पोलीस तक्रार घेत नाही, सरकारी यंत्रणा एजन्ट च्या बाजूने आहे. कारण एजन्ट ला तालुक्यातील पुढऱ्याची मदत आहे. घोडेगाव महसूल विभाग हि एजन्ट ला सर्व मदत करीत आहे. पीडित शेतकरी लवकरच या एजन्ट व या जमीन घोटाळ्यांत असलेले सरकारी अधिकारी यांच्या वर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या कडे एक्ट्रा सिटी कायद्या खाली गुन्हा दाखल करण्याची विनंती अर्ज करणार आहे. शेतकऱ्या ला आता त्याची जमीन परत मिळाविण्यासाठी हा एक मेव पर्याय उरला आहे....
बातमीदार
काळुराम राजगुरू, पुणे.

31
4395 views