
कुंभार यांना उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्कार
रांजणगाव गणपती प्रतिनिधी :
शिरूर - द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार. रांजणगाव गणपती (तालुका शिरूर) येथील बाळासाहेब निवृत्ती कुंभार यांना "उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्कार" देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. यावेळी. मा. तृप्ती देसाई संस्थापक अध्यक्ष भूमाता ब्रिगेड. श्री. रंगनाथनाईकडे 'मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक नागपूर से. नि मा. बाळासाहेब म्हस्के ' तहसीलदार शिरूर मा. ज्योतीराम गुंजवटे पोलीस निरीक्षक शिरूर पोलीस स्टेशन. मा सागर शिंदे संपादक, दैनिक सार्वभौम मा. बाबासाहेब काळे संचालक खरेदी-विक्री संघ अहिल्यानगर. पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख रास्क्वसचिव विवेकानंद फंड मा. सुधीर ढमढेरे, विराज शिंदे सरकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी प्रशस्तीपत्रक शाल पुष्पगुच्छ गौरवचिन्ह देऊन कुंभार यांना सत्पत्नीक सन्मानित केले. कुंभार यांचे समाजकार्यातील योगदानाबद्दल त्यांना या अगोदरही कुंभार समाज उन्नती मंडळाचा कोरोना योद्धा प्रेरणा पुरस्कार मिळालेला आहे सदर कार्यक्रम शिरूर (घोडनदी) नगरपरिषद सांस्कृतिक हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडला