अवैध दारू विक्री ग्रामीण भागातील एक मोठी समस्या
दि.०७ बदनापूर
अंबडगाव गावातील अवैध दारू विक्रीमुळे गावातील चार लोक दारूच्या अती सेवनाने मृत्यू पावली यामुळे गावातील सर्व जाती धर्मातील महिला एकत्रित येऊन बैठक घेतली व गावातील अवैध दारू विक्री दुकानावर धडक मोर्चा काढण्यात आला तसेच दुकानदारांना सज्जड इशारा दिला या नंतर जर गावात दारू विक्री केली तर बेदम मारहाण करण्यात येईल. बैठकीला गावचे सरपंच व वडीलधारी मंडळी तरुण वर्ग उपस्थित होता.राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिस प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री केली जाते यातूनच असे मुल बाळ लहान असताना संसार उघड्यावर पडतात.राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिस प्रशासन यांनी वेळीच लक्ष दिले कडक कायदेशीर कार्यवाही केली तर ग्रामीण भागातील तरुण वर्ग व्यसनाधीन होण्यापासून वाचू शकतो. अशी ग्रामीण भागातील परिसरात सर्वत्र चर्चा सुरू आहे.