सैलानी बाब येथे भोंदू बाबांची भोंदूगिरी बंद करणेसाठी रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. दुर्गेश राजपूत साहेब यांची दबंग कामगिरी.
सैलानी बाबा देवस्थान हे सर्व धर्मीय हिंदू मुस्लीम एकताचे प्रतीक असून येथे येणारे काही भाविक हे विशेषकरून मानसिक रोगी असतात यांचा वैद्यकीय उपचारावर विश्वास नसतो हे भाविक भक्त सैलानी बाबा वर श्रध्दा व विश्वास ठेवून येथे येतात यांना ह्या ठिकाणी आर्थिक लूट करणारे काही भोंदू बाबा धोक्यात आणून मानसिक रोगीना व त्याचा परिवाराला आपल्या जाळ्यात फसवतात त्याची वारंवार आर्थिक लूट करतात शारीरिक त्रास देतात.
अशीच घटना आज मा पोलीस निरीक्षक श्री राजपूत साहेब रायपूर पोलीस स्टेशन यानी उघडीस आणली मूळचा खामगाव तालुक्यातील राहणारा इरफान शाह रमजान शाह या भोंदूगिरी करणाऱ्या इसमास अटक करून जे्रबंद केले आणि साहेब म्हणाले की अशा भोंदूबाबांच्या विरोधात मी नेहमी राहिल अशा लोकांना आळा बसवण्यासाठी मी माझ्या सोईने प्रयत्न करत असतो व संबंधित अधिकारी यांना सूचना देत असतो.
जेणेकरून गोरगरीब भाविकांची भोंदूबाबा कडून फसवणूक होऊ नये म्हणून श्री दुर्गेश राजपूत साहेब पुढेही अशी कामगिरी करून गोरगरीब भाविक भक्तांना न्याय देतील या बद्दल गोरगरीब भाविक भक्ताकडून साहेबांचे अभिनंदन..