: दिनांक ०७/०७/२४ रोजी रथयात्रा आणि या दिवसाचे विशेष महत्व
मनिष गोसावी (होराभूषण)
दिनांक ०७/०७/२०२४ रोजी भगवान श्री जगन्नाथ यांचा रथ यात्रेचा दिवस आहे आणि पुरी येथे भगवान जगन्नाथाचा उत्सव देखील चालू असल्याने खास करून रविवारी म्हणजे दिनांक ०७/०७/२०२४ रोजी पहाटे सकाळी ०४.५९ मिनिटांनी द्वितीया तिथी पुष्य नक्षत्र लागत आहे या दिवशी रवीपुष्य योग दिवसभर आहे आणि सर्वार्थ सिद्धयोग दिवसभर आहे तसेच याच दिवशी अग्नि वास पृथ्वीवर आहे आणि शिववास हा गौरी सह आहे.
असा सर्वार्थसिद्धयोग, रविपुष्य योग आणि अग्निवास पृथ्वीवर तर शिववास गौरी सह असा दुर्मिळ योग वर्षातून फक्त २ वेळेस येतो त्यामुळे या दिवशी पहाटे पासून शक्य तेवढा भगवान शिव आणि विष्णुचा आणि जगदंबा यांचा जप, होम हवन, विशिष्ट संकल्पा सहित केल्यास अधिक फायदा होतो खास करून ऋण मुक्ति, आरोग्य, एश्वर्य, विवाह यासाठी संकल्प करून केल्यास आधिक लाभदायक ठरतो