logo

सैलानी मध्ये भोंदू बाबाचा ‘पर्दाफाश’,अन् पोलिसांनी केलं ‘स्टिंग ऑपरेशन’ जादू टोना प्रतिबंध कायदा नुसार रायपूर ठाण्यात पहिला गुन्हा दाखल

सैलानी मध्ये भोंदू बाबाचा ‘पर्दाफाश’,अन् पोलिसांनी केलं ‘स्टिंग ऑपरेशन’ जादू टोना प्रतिबंध कायदा नुसार रायपूर ठाण्यात पहिला गुन्हा दाखल



रायपूर. सैलानी दर्गा येथे भोंदू बाबांचा हैदोस वारंवार वाढत चाललेला आहे त्याला आढा घालण्या साठी रायपूर पोलिसानी कंबर कसली आहे नुकतीच एक घटना घडली आहे.
घटना अशा प्रकारे आहे की, यातील नमुद आरोपी -इरफान शहा रमजान शहा रा. सैलानी याने फिर्यादी- सौ.सुमनबाई विठठल जाधव, वय 72 वर्षे धंदा-शेती जात बंजारा
रा.येनोली तांडा. जिंतुर जि.परभणी. यांचा नातु विकी पुडंलिक जाधव यांचेवर सैलानी बाबा दर्गा येथे जंतर मंतर करून त्याचे आंगावर लिंबु कापून उतरून घेवून पैशाची
मागणी करून भिती दाखवून फसवणुक केली व फिर्यादी. यांचे नातावाचे हात पायाला बेड्या टाकून
साखळी ने बांधून अघोरी उपचार करून पिळवणुक केली आहे फिर्यादी यांचे तोडी रिपोर्ट वरून भोंदू बाबा इरफान शहा रमजान शहा रा. सैलानी यांच्या विरुद्ध कायमी अप.क्रं. 148/24 कलम 3(1).3(2) महाराष्ट्र नरबळी आणी इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रतीबंध घालण्या बाबत व तयांचे समुळ उचटन करणे बाबत अधिनियम 2013 नुसार गुन्हा
दाखल केला आहे यात पो स्टे चे राजेश गवई व ओमप्रकाश साळवे यांचा सहभाग होता. सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. ठाणेदार दुर्गेश राजपुत हे करीत आहे.

427
17844 views