अलोट गर्दीमध्ये रुग्णवाहिकेला जाण्यासाठी मोकळे वाट करून दिले हे तर मुंबईच्या लोकांचे समय सूचकता आहे
टीम इंडियाच्या स्वागतासाठी मरिन ड्राइव्हवर हजारो चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे टीम इंडियाची मुंबईतील मरीन ड्राईव्हवर विजयी परेड निघाली. आपल्या टीमच्या स्वागतासाठी या मार्गावर हजारोंच्या संख्यने चाहते जमले. अशा तुफान गर्दीतही मुंबईकरांनी माणुसकी जपली अन् या मार्गाने रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला तात्काळ जागा करून दिली मुंबईकचांच्या समयसूचकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्यासाठी मुंबई पोलिस कर्मचारी आणि निरीक्षक स्तरावरील अधिकारीही सज्ज आहेत. दरम्यान, चाहत्यांची वाढती संख्या पाहता मुंबई पोलिसांनी लोकांना मरिन ड्राइव्हवर न येण्याचे आवाहन केले आहे. तर, ही गर्दी पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी संवाद साधला अन् गर्दींचे संनियत्रण करण्याचे निर्देश दिले आहे