मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ऑनलाईन अर्जात बदल
अकोला : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत.अर्ज भरण्याची मुदत ही 31 ऑगस्ट पर्यंत करण्यात आलेली आहे म्हणजे आपल्याला कमीत कमी दोन महिन्याची मुदत या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी देण्यात आलेली आहे.दुसरा महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे डोमेसेलची अट हे रद्द करण्यात आलेली आहे आता हा अर्ज ऑनलाईन करण्याकरिता डोमिसिअल लागणार नाही तर त्या त्याबद्दल पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा टीसी ज्याला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणतात किंवा जन्माचा दाखला यापैकी एक डॉक्युमेंट असलं तरी चालेल ,
तिसरा महत्त्वाचा बदल आहे वयोमर्यादा ही 21 ते 65 वर्ष अशी करण्यात आलेली आहे,
चौथा महत्त्वाचा बदल समजा एखादी महिलेने परराज्य म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरून जर एखादी महिला लग्न करून आलेली असेल तर त्या महिलेला पतीचा जन्म दाखला किंवा टीसी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र सुद्धा देता येईल,पाचवा महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे ज्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाख पेक्षा कमी असेल आणि त्यांच्याकडे पिवळे व केशरी राशन कार्ड असेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखला लागणार नाही याच्यामधून सुद्धा सूट देण्यात आलेली आहे.
सहावा महत्त्वाचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या की अविवाहित मुलगी परंतु त्या मुलीचे वय 21 वर्ष पेक्षा जास्त असायला पाहिजे ती मुलगी सुद्धा या योजने करिता पात्र असणार आहे अशा प्रकारे महत्त्वाचे बदल आज शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या मध्ये करण्यात आलेले आहे तरी सर्व महिलांनी या योजनाची ऑनलाइन फॉर्म चालू झाल्यानंतर आपण ऑनलाइनच फॉर्म भरावा जेणेकरून तो फॉर्म अचूक रित्या आणि व्यवस्थित भरल्या जाईल आणि आपण कोणीही त्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.अशी माहीती शिवशंकर पाटील किसान मोर्चा सोशल मीडिया संयोजक अकोला जिल्हा वारकरी साहित्य परिषद जिल्हाध्यक्ष एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसद जिल्हा समन्वयक व सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य अकोला जिल्हा प्रसिद्धी प्रमुख यांनी दिली आहे.