logo

प्रेस नोट महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नागपूर. विभाग 71 वा वर्धापन दिन सोहळा 1 जुलै 2024 ला कामगार कल्याण भवन रघुजी नगर नागपूर येथे संपन्न झाला.

नागपूर प्रतिनिधी,

नागपूर विभागासह अकोला विभागाच्या अतिरिक्त पदभार मा. राठोड साहेब यांच्याकडे असल्यामुळे एकंदरीत विदर्भाच्या अकरा जिल्हामधून गट व विभाग स्तरावर मंडळाचा वर्धापन दिन सोहळा कामगारांच्या व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
आपल्या नागपूर मध्ये रघुजी नगर महाराष्ट्र कामगार कल्याण भवन सभागृहात, अमरावती येथे प्रशांत नगर छाबडा सभागृहात, तसेच अकोला येथील दाबली रोड येथील मंडळाच्या सभागृहात आजचा हा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
या वर्धापन दिनाचे निमंत्रण पत्रिका सर्व सन्माननीय खासदार, आमदार महोदय तसेच इतर मोठे मान्यवर, कामगाराचे नातेवाईक, मालक व कामगार तसेच व्यवस्थापन असोसिशनला पाठविण्यात आले होते.
खालील काही मान्यवरांनी लिखित स्वरूपात शुभ संदेश मंडळाला पाठवलेले आहे.
१) नागपूर माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार नितीनजी राऊत
२) महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार मंत्री v विद्यमान आमदार डॉ.संजय कुटे
३) बडनेरा जिल्हा अमरावती येथील आमदार मा. रवी राणा यांचे संदेश
या कार्यक्रमात हिन्दी व मराठी सुश्राव्य संगीत, जुन्या व नव्या गीतांचा कार्यक्रम झाला. त्याला भरपूर प्रेषक (कामगारांचे नातेवाईक व त्यांची मुले) उपस्थित होते. काहींनी आपआपले अनुभव सांगितले. काही जुन्या गोष्टीच्या आठवणीना उजाळा मिळाला. आणि काही मान्यवरांच्या हस्ते तेथील उत्कृष्ट कामगारांचा सत्कार करण्यात आला.
ऑल इंडिया मीडिया असोसिएशन
नागपूर
देवाशीष टोकेकर

3
5605 views