
Mumbai Goa Highway Accident
मुंबई --- गोवा महामार्गावर तुरळ जवळील भीषण अपघातात २१ वर्षीय विघ्नेश करंडेचा दुर्दैवी मृत्यू*
*बोलेरोची मोटर सायकलला धडक बसल्याने विघ्नेशचा जागीच मृत्यू*
संगमेश्वर:---मुबंई -गोवा राष्ट्रीय महामार्गांवर तूरळ हरेकरवाडी येथे बोलेरो पिक - अप आणि दुचाकी मधे भीषण अपघात झाला असून या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.
तर बोलेरो चालक व त्यातील अन्य तीन प्रवाशी जखमी झाले आहेत.ही घटना आज सकाळी साडे अकरा च्या सुमारास घडली.*
धामणी पेट्रोल पंपावर काम करणारा विघ्नेश आत्माराम करंडे वय वर्षं 21 राहणार तूरळ पाचकले वाडी हा MH08/AB4692 पॅशन प्रो दुचाकीने आरवली ते धामणी प्रवास करताना धामणी ते आरवली च्या दिशेने सुसाट वेगात येणाऱ्या MH08/AB4692 बोलेरो वाहन चालक परेश हेमंत देवरुखकर याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने विरुद्ध दिशेला जात दुचाकीला फरफटत नेले.
यात दुचाकीस्वार विघ्नेश करंडे हा गाडीवरून काही अंतरावर फेकला गेला व त्याचा जागीच मृत्यू झाला.तर बोलेरो ही रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली.
या बोलेरो मधील चालक परेश देवरुखकर याच्या पायाला किरकोळ मार लागला असून बोलेरो मधून प्रवास करणाऱ्या तीन वर्षीय रियांश समीर सकपाळ धामणी हिच्या डोळ्याला दुखापत,सिया समीर सकपाळ 26 वर्ष धामणी किरकोळ जखमी तर पल्लवी सीताराम धामणक 24वर्ष याचा हात फॅक्चर झाला आहे.*
अपघातात मृत झालेला विघ्नेशला तीन बहिणी असून,तो आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.
वडील सततचे आजारी असल्याने कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर होती. तो धामणी येथील पेट्रोल पंपावर नोकरीला होता.
त्याच्या अपघाताची व मृत्यूची बातमी समजताच सर्वत्र शोककळा पसरली व अनेकांनी अपघातस्थळी धाव घेतली.*
संगमेश्वर पोलिस पोलीस उप निरीक्षक प्रशांत शिंदे, पोलीस उप निरीक्षक विवेक साळवी, पोलीस कॉनस्टेबल विश्वास बरगाले, चालक सचिन जाधव, खाडे यांनी अपघातस्थळी पोचून पंचनामा करून वरिष्ठाच्या सूचनेनुसार पुढील तपास चालू केला आहे.
तर या अपघातात मृत झालेल्या विघ्नेश याचे संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.*