शेताच्या बांधावर शेतकऱ्यांचा सत्कार
शासनाने शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करावे -डॉ.अरविंद कुळमेथे
*कृषी दिन व श्री.वसंतराव नाईक जयंती साजरी*.
यवतमाळ(वसीम शेख):- १ जुलै रोजी राळेगाव विधानसभा मतदार संघात बिरसा ब्रिगेड चे अध्यक्ष डॉ. अरविंद कुळमेथे यांच्या नेतृत्वात क्रांतीसुर्य श्री.वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनी व कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी कृषी दिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांचे शेतात जाऊन त्यांच्या शेताच्या बांधावर शेतकऱ्यांना शाल,श्रीफळ, पुष्प गुच्छ, सन्मान टोपी देऊन त्यांचा सत्कार डॉ. अरविंद कुळमेथे यांच्या हस्ते भव्य सत्कार करून सन्मान करण्यात आला. या सोबतच कळंब शहरात वृक्षारोपण ही करण्यात आले.
यावेळी डॉ.कुळमेथे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या प्रसंगी शेतकऱ्यांची पावसा अभावी दुबारा पेरणी झाली त्या शेतकऱ्यांना सरकारने पीकविमा त्वरित द्यावा,मागील भाव वाढीच्या पिकाची भरपाई करावी, सरकारणे सरसकट कर्ज माफी करून शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करावे. सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यास बीरसा ब्रिगेड आंदोलन पुकारेल. असे डॉ.कुळमेथे म्हणाले.यावेळी बिरसा ब्रिगेड चे संघटक प्रा. वसंत कनाके यांनी निसर्ग शक्तीला विनंती करून ,शेतकऱ्यांना भरभरून पिक उत्पन्न देवो.शेतकरी राजा सुखी होवो अशी प्रार्थना केली.या वेळी बिरसl ब्रिगेडचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संपर्क प्रमुख उमेश येरमे, कळंब तालुका अध्यक्ष प्रमोद इरपाते, राळेगाव विभाग संपर्कप्रमुख सुरज मरस्कोल्हे ,किशोर कांगले सावरगाव सर्कल प्रमुख, निकेश कनाके ,सावरगाव सर्कल संपर्कप्रमुख, दिनेश मडावी, संदीप कनाके, सचिन काकडे, संदीप खडसे, प्रभाकर मडावी, सुनील काळे, अशोक भिसे, मारोती वडेकर, सुरेश मेश्रम, हरिदास भिसे, प्रभाकर देवतळे, अक्षय भिसे, रवी मांढरे, सुनील येरमे, प्रशांत वडेकर, पिंटू नहारे, स्वप्निल भुजाडे, विकास देवतळे पदाधिकारी व शेतकरी बांधव इत्यादी यावेळी उपस्थित होते.