logo

एक अकेला राहुलजी गांधी ,सबपे भारी

*"विरोधी पक्षनेता" काय असतो, हे राहूल गांधींनी आज देशाला दाखवून दिलं..*
राहूल गांधी यांनी सरकारला धो धो धुतलं..
राहूल गांधी म्हणाले,
नरेंद्र मोदी
आरएसएस
बीजेपी
म्हणजे हिंदू समाज नाही..
बीजेपीला हिंदुत्वाचा ठेका दिलेला नाही..
हिंदू समाज शांतता प्रिय आहे,
हिंसा आणि नफरत आणि दहशत भाजपने पसरविलेली आहे.. असा आरोप त्यांनी केला..
अग्निवीर योजनेबद्दल राहूल गांधींनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं,
नोटबंदी करोडपतींसाठी होती हे त्यांनी ठणकावून सांगितलं
मणिपूर मध्ये सिव्हिल वॉर सुरू करून पंतप्रधानांनी त्याकडे दुर्लक्ष केलं..
पंतप्रधान मणिपूरला गेले नाहीत? का? मणिपूर भारताचा भाग नाही? हा सवालही त्यांनी केला..
एक एक मुद्दा घेऊन राहूल गांधी सत्ताधाऱ्यांवर तुटून पडत राहिले.. ..
राहूल गांधी याचं आजचं भाषण अभ्यासपूर्ण होतं,
भाषणात आवेष, आक्रमकता होती आणि नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षे ज्या मनमानी पद्धतीनं देश, सरकार चालवले त्याबद्दल संताप होता.
राहूल गांधी यांचा एक एक शब्द भात्यातून निघणारया बाणासारखा होता..त्यानं सत्ताधारी घायळ होत होते..
राहूल गांधी भाषण करीत असताना नरेंद्र मोदी यांनी दोनदा, अमित शहा यांनी तीन वेळा, राजनाथसिंह यांनी दोनदा टोकले, अडथळे आणले..
नरेंद्र मोदी उभे राहून अडथळा आणत असतानाचे दृश्य अद्भूत होते..
यातून त्यांची अस्वस्थता: दिसत होती..
नरेंद्र मोदी कायम विरोधी पक्षाची टिंगल टवाळी करीत आले..
मात्र आज उभे राहून ते म्हणाले,
"लोकतंत्र और संविधानने मुझे सिखाया है की, विपक्ष के नेता को गंभीरता से लेना चाहिए.."
हा बदल आहे..
पंतप्रधान मोदींमध्ये हे परिवर्तन राहुल गांधी यांनी घडवून आणलंय..

8
5978 views