logo

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी--- खासदार -"ओम राजे निंबाळकर "यांची केंद्रीय कृषी मंत्री "शिवराज सिंह चौहान "यांच्याकडे मागणी*

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या परिपत्रकामुळे झालेल्या अन्याय दूर करून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई देण्याबाबत आदेश द्यावे अशी मागणी धाराशिव लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय कृषी तथा ग्रामीण मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

निवेदनात केलेली मागणी पुढील प्रमाणे

धाराशिव जिल्ह्यातील 560468 सोयाबीन शेतकऱ्यांनी पीक विमा भरून त्यांच्या सोयाबीन पिकाचे संरक्षण केले होते. धाराशिव जिल्ह्यात अत्यल्प पावसामुळे, 21 दिवसांच्या पावसाची रक्कम घेतल्यानंतर, पीक विमा कंपनी HDFC द्वारे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 254 कोटी रुपयांचे 25% आगाऊ पेमेंट वितरित करण्यात आले.




सप्टेंबर-ऑक्टोबर-2023 मध्ये झालेल्या पावसामुळे पीक विमा कंपनीला आगाऊ माहिती देणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या 1 लाख 92 हजार आहे. केंद्र सरकारने 30 एप्रिल 2024 रोजी अचानक एक परिपत्रक जारी केले असून ते शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहे. नवीन परिपत्रकातील तरतुदीनुसार धाराशिव जिल्ह्यातील 37 हजार 574 शेतकऱ्यांना वैयक्तिक नुकसानभरपाई म्हणून 39 कोटी 52 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. धाराशिव जिल्ह्यातील 57 महसुली विभागांपैकी केवळ 25 महसुली विभागांना ही मदत देण्यात आली. आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यातील ३२ महसुली विभागातील एकाही शेतकऱ्याला वैयक्तिक नुकसानीचा एक रुपयाही मिळालेला नाही. केंद्र सरकारचे 30 एप्रिल 2024 च्या परिपत्रकामुळे धाराशिव जिल्ह्यात भरलेल्या पीक विमा पैकी पाच लाख एकोणीस हजार शेतकरी पिक विमा भरपाई पासून वंचित राहणार आहेत राज्य शासनाच्या 31 ऑक्टोबर 2023 च्या शासन निर्णयानुसार धाराशिव जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत यानंतर राज्य सरकारने डी टी 29 नोव्हेंबर 2023 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील 100021 महसूल विभाग दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील सर्व महसूल विभागात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे आणि 50 टक्क्याहून अधिक पीक नुकसान स्वीकारले आहे मात्र केंद्र सरकारच्या परिपत्रकामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यावर अन्याय झाला आहे तथापि एचडीएफसी पिक विमा कंपनीने दिनांक 26 जून 2023 च्या शासन निर्णयानुसार धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई देण्याबाबत आपल्या स्तरावरून आदेश जारी करावेत असेही विनंती या पत्रामध्ये करण्यात आली आहे

51
26917 views