
एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल शेंडेगाव येथे महाराष्ट्र कृषी दिन व डॉक्टर्स डे साजरा
शहापूर/एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल शेंडेगाव, तालुका-शहापूर, जिल्हा- ठाणे या शाळेमध्ये महाराष्ट्र कृषी दिन व डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भातसा प्रकल्पाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर मिलिंद चन्ने ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री झिपा वीर उपस्थित होते.
डॉ मिलिंद चन्ने यांनी मुलांना आपण आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी व आजारापासून सुरक्षित कसे राहवे याविषयी मार्गदर्शन केले. तर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झिपा वीर यांनी वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे या तुकारामाच्या उक्तीचा भावार्थ सांगून विद्यार्थांना झाडांचे महत्व स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रभारी प्राचार्य श्री कुबेर कोळेकर हे होते. कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक यांच्याकडून विद्यार्थ्यांना पुरवण्यात आलेल्या चादर, सतरंजी व बेडशीट यांचे वाटप करण्यात आले तसेच शाळेच्या आवारामध्ये सर्व मान्यवर व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या हस्ते काजू, आवळा, जांभूळ, चिंच, वड दिकामली इ. झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पुनाजी सूर्यवंशी सर यांनी केले, आभार प्रदर्शन श्री काशिनाथ भला सर यांनी केले. शाळेचे प्राचार्य श्री अरुण मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.