
आदिवासी भागात निकृष्ट दर्जाची कामे, बांधकाम विभाग ठेकेदाराना पोसत आसल्याचा आरोप
भंडारदरा :- भंडारदरा मुतखेल फाटा येथे आज आदिवासी भागातील नवगाव डांगाणातील ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले. भंडारदरा परिसरात रतनवाडी,कोलटेंभे, मुतखले,ह्या परिसरात मागील सहा महिन्यापासून बस सेवा बंद आहे.रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने ह्या भागातघन नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत. विकास कामांचे मोठ मोठे फलक लावले मग ह्या कामांची कॉलेटी कोन चेक करणार तसेच पावसाळ्यात देखील काँक्रीटीकरनाची काम चालू असल्याने ते काम किती दर्ज्याचे असेल या बाबतीत प्रश्नचिंन उपस्थित करण्यात आले तसेच जल जीवन मिशनच्या कामात देखील अधिकारी ठेकदर यांचा मनमानी कारभार सुरू आहेत, अनेक ठिकाणी तलाठी कार्यालयांची कामे अपूर्ण स्थितीत आहेत तर भंडारदरा ते शेंडी दरम्यान जो रस्ता झालेला आहे तो देखील अपुर्ण आहे अश्या विविध प्रश्नांनाच्या बतीत आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले व बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराव प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आले. आज शनिवार आसल्या कारणाने भंडारदरा परिसरात माठ्या संखेने पर्यटक आल्याने गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या पोलिस प्रशासनाने मध्यस्थी करून व बांधकाम विभागचे अधिकारी, महसुल विभागाचे प्रतिनिधी यांना लेखी देउन व त्यांच्याकडून लेखी आश्वासन घेऊन रस्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थित केल आहे. आंदोलनं वेळीस भरत घाणे मां सभापति अकोले तसेच विजय भांगरे आदिवासी सेल जिल्हा अध्यक्ष, पांडूरंग खाडे मां सरपंच,दगडु पांढरे पाटील,संपत झडे सुनिल सारुक्ते, संतोष सोडणर,सोमनाथ झडे,भास्कर बुळे,अंनत घाने, अशोक उघडे, गंगाराम ईदे ( उपसरपंच भंडारदरा ), विठ्ठल खाडे, पोपट खाडे ,भाऊराव भागंरे,भांवता झडे, किसन अंबावने,बाजीराव सगभोर,आशोक भोजने,ज्ञानेश्वर झडे,बुधा पाटील इदे,निवृती बूळे,शरद इदे, लक्ष्मन खाडे, तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.