logo

Asif Shaikh Yusuf Buldana Maharashtra AIMA न्यूज

वहिनीचा खून करणार्‍या दिरास जन्मठेप !
जिथे झाला खून, त्याठिकाणी न्यायाधीशांनी स्वतः केले होते स्थळनिरीक्षण

बुलढाणा, 25 जून (AIMA न्यूज) ः वहीणीस मारहाण करून खून करणा-या आरोपी दिरास सश्रम जन्मठेप आणि 500 रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. भादोला येथे 2020 मध्ये आरोपी राजु चिंकाजी गवई (42) याने सख्खी वहिनी बेबीबाई संतोष गवईला लाकडी दांड्याने मारहाण करून संपविले होते. काल, सोमवार, 24 जून रोजी सदर प्रकरणाचा निकाल लागला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी यांनी आरोपी राजु गवईला जन्मठेप सुनावली. 500 रुपये दंडही ठोठावला आहे. सदर प्रकरणात न्यायाधीश श्री खटी यांनी सीआरपीसीची कलम 310 नुसार स्वतः स्थळनिरीक्षण केले होते हे विशेष.
फिर्यादी संतोष चिंकाजी गवई, रा. भादोला ता. जि. बुलडाणा येथे रहात असुन त्याची पत्नी सौ. बेबीबाई संतोष गवई (वय 55) यांना दोन मुले व तीन मुली आहेत. फिर्यादीला राजु नावाचा भाऊ आहे. त्याने घरून काही पैसे आणि वस्तू चोरल्यामुळे बेबीबाईंनी आपल्या दिराविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. यामुळे चिडलेल्या राजु गवईने 27 डिसेंबर 2020 रोजी भादोला येथे फिर्यादीच्या रहात्या घरी बेबीबाई संतोष गवईसोबत भांडण केले आणि लाकडी दाडयांने डोक्यावर आघात केले. त्यामुळे बेबीबाई संतोष गवई याच्या डोक्यातुन रक्तस्त्राव सुरू होता. त्यावेळी शेजारी राहणारा संदीप गवई तेथे गेला असता व सौ. बेबीबाई संतोष गवई हिस तिला काय झाले ? या बददल विचारले असता तिने सांगीतले की, राजु गवई याने मारले. त्यानंतर तिला उपचारासाठी सरकारी दवाखाना बुलडाणा येथे भरती केले. सदर रिपोर्ट वरून आरोपी राजु गवई याचे विरूध्द कलम 307 भा.दं.वी नुसार पोलीस स्टेशन बुलडाणा ग्रामीण येथे अपराध क्र. 460/2020 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. इकडे उपचारादरम्यान दूसर्‍या दिवशी 28 डिसेंबर 2020 रोजी सौ. बेबीबाई संतोष गवई हया औरंगाबाद येथे घाटी रुग्णालयात मयत झाल्या. त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये कलम 302 व कलम 452 आरोपी विरूध्द समाविष्ट करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास सर्वप्रथम पीएसआय श्री रामपुर तसेच पीआय सारंग नवलकर त्यानंतर उप विभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी करून आरोपीविरूध्द भरपूर पुरावा मिळून आल्यामुळे दोषारोपपत्र बुलडाणा येथील न्यायालयामध्ये दाखल केले.

20
5331 views