वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्हा पूर्व तर्फ राजश्री शाहू महाराज जयंती दिनी ओबीसी आरक्षण ठरावाचे वाचन
यवतमाळ(वसीम शेख):- दिनांक 26 जूनला राजश्री शाहू महाराज यांचे 150 व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्हा पुर्वतर्फे
यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष डॉ.नीरज वाघमारे यांनी पुष्पहार घालून त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचेयवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष डॉ.नीरज वाघमारे यांनी आदर्श शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. व ओबीसी आरक्षणाबाबत ठराव मंजूर करण्यात आले. जिल्हा महासचिव शिवदास कांबळे,धम्मवती वासनिक महिला आघाडी अध्यक्ष यांनी 11कलमी ठरावाचे वाचन केले.ठरावात ओबीसींची राष्ट्रीय जनगणना करण्यात यावी, खाजगी नोकरी मधील आरक्षण आहे ते सुरू करण्याबाबत शासनाला 11 कलमी ठराव मंजूर करण्यात आले.
ओबीसी करिता जातीनिहाय जनगणना करणे,मागासवर्गीय आयोग स्थापन करणे, ओबीसी समाजाचा मागासलेपण सिद्ध करण्यासाठी आणि एस.सी, एस.टी.च्या आरक्षणाला धक्का न लावता 50% पेक्षा जास्त आरक्षण न देणे, यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करणे, मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणा मधून आरक्षण देण्यात येऊ नये, याकरिता सरकारचे जे वर्तन बेजबाबदारपणा, पक्षपातीपणा, दडपशाही आणि दादागिरीचे सुरू आहे ते थांबविण्यात यावे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे ताबडतोब थांबण्यात यावे. आणि जे दिलेले आहे ते रद्द करावे आणि सगेसोयरे याचा जो अध्यादेश शासनाने काढला आहे तो रद्द करण्यात यावे या व ईतर 11 कलमी ठरावाचे निवेदन वंचित बहुजन आघाडीने दिले आहे. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते व महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष धम्मवती वासनिक,महासचिव पुष्पाताई शिरसाट, कोषाध्यक्ष अरुण भाऊ कपिले, उपाध्यक्ष विशाल पोले, सरला चचाने,जिल्हा महासचिव महिला आघाडी संध्या काळे उपाध्यक्ष,मिना रणीत,उपाध्यक्ष भारतीताई सावते , विवेक वाघमारे, शहर उपाध्यक्ष रत्नमाला कांबळे, शहर महासचिव इंजि. दीपक नगराळे, माजी उपाध्यक्ष शैलेश भानवे,ऍड शाम खंडारे,आनंद भगत, संतोष राऊत, गजानन कोकाटे, विलास वाघमारे,गजानन सावळे, उत्तमराव कांबळे, शोभनाताई कोटंबे, दर्शना मेश्राम, सुकेशनी खोब्रागडे, निशा निमकर, रोशनी पुडके, जयश्रीताई, माया मस्के, सविता तिडके, प्रमोद पाटील, प्रणाली वनकर, हर्षलता देशभ्रतार, शारदाताई, अशोक मनवर, सुधीर खोब्रागडे, विवेक वाघमारे,शैलेश मस्के, निलेश स्थूल इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.